IMPIMP

बदल्यांचे रॅकेट, फोन टॅपिंगवर अजित पवार म्हणाले, ‘त्या बदल्या…’

by pranjalishirish
ajit pawar breaks silence on phone tapping transfer racket in mumbai police

मुंबई : ‘पोलिसांच्या बदल्या या त्या बदल्यांसाठी असलेल्या समितीच्या शिफारसीनुसारच झाल्या आहेत. कोणत्याही अधिकाऱ्यांच्या बदल्या कागदपत्रामध्ये नमूद केलेल्या ठिकाणी झालेल्या नाहीत’, असे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar  यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस दलातील बदल्यांचे रॅकेट सुरु असल्याचे खळबळजनक विधान केले होते. त्यानंतर अजित पवार यांनी यावर भाष्य केले.

PM नरेंद्र मोदींच्या बांग्लादेशी दौर्‍यावर पाकिस्तानचा सवाल, बांग्लादेश वासियांनी दिले त्यांना चोख प्रत्युत्तर

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार  Ajit Pawar बोलत होते. ते म्हणाले, ‘गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या परवानगीनेच कोणत्याही तपास अधिकाऱ्याला फोन टॅपिंग करायचे असल्यास करता येते. त्यामुळे तेव्हा अशाप्रकारची परवानगी घेतली होती का? पोलिसांच्या बदल्या कोणाच्या सांगण्यावरून केल्या गेल्या? नेमकं काय झालं? या सगळ्याचा अहवाल तत्कालीन गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि सध्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी मागवला आहे. हा अहवाल आज संध्याकाळपर्यंत येईल. त्यानंतर याची माहिती जनतेला देण्यात येईल’.

ठरलं ! शिमग्यानंतर होणार मंत्रिमंडळात फेरबदल ?

दरम्यान, पोलिस दलात बदल्यांचे रॅकेटवर बोलताना अजित पवार Ajit Pawar  म्हणाले, ‘फडणवीसांनी जी कागदपत्रे दिली, ती आमच्याकडेही आहेत. ज्या अधिकाऱ्यांची नावे त्यामध्ये आहेत, त्यापैकी कोणत्याही अधिकाऱ्यांच्या बदल्या कागदपत्रामध्ये नमूद केलेल्या ठिकाणी झालेल्या नाहीत. पोलिसांच्या बदल्या त्यासाठी असलेल्या समितीच्या शिफारसीनुसारच झाल्या आहेत, असे म्हणत सर्व आरोप खोडून काढले.

Also Read : 

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

M नरेंद्र मोदींच्या बांग्लादेशी दौर्‍यावर पाकिस्तानचा सवाल, बांग्लादेश वासियांनी दिले त्यांना चोख प्रत्युत्तर

Ramdas Athawale : ‘ठाकरे सरकार कलंकित, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही’

संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत ? काँग्रेसचा संतप्त सवाल

Ration Card Latest News : रेशन घेण्याबाबत जर तुम्ही सुद्धा करत असाल ‘अशी’ चूक तर व्हा सावध, होऊ शकते 5 वर्षांची जेल

‘केरळचे लोक सुशिक्षित असल्याने भाजपला मतं मिळत नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य

मोठी बातमी ! अखेर राऊतांनी फडणवीस मुख्यमंत्री न होण्याचे सांगितलं कारण; म्हणाले…

परमबीर सिंग, गृहमंत्री देशमुख यांच्यातील वाद उच्च न्यायालयात, 30 मार्चला सुनावणी

Param Bir Singh : परमबीर सिंग यांच्याबाबत राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त येऊ शकतात अडचणीत

Related Posts