IMPIMP

Ajit Pawar | पोलीस मुख्यालयात अजित पवार यांच्या कामाचा धडाका पाहून अतिवरिष्ठ ‘अवाक’; उपमुख्यमंत्री म्हणाले – ‘मला अशा कामाच्या पाहणीला बोलवलं तर मी लई बारीक बघत असतो, माझ्या भाषेतच सांगायचं तर हे ‘छा-छु काम’ आहे’

by omkar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – आणखी एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कामाचा धडाका पुणे पोलीस व अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना आज पाहण्यास मिळाला. पोलीस मुख्यालयात (police headquarters pune) इमारतीच्या डागडुजीच्या कामकाजाची पाहणी करण्यास आलेले अजित पवार (Ajit Pawar) भलतेच भडकले. ‘मला अशा कामाच्या पाहणीला बोलवलं तर मी लई बारीक बघत असतो, माझ्या भाषेतच सांगायचं तर हे ‘छा-छु काम’ आहे’. या ठेकेदाराने पोलिसांचेच काम असं केलंय तर बाकीच्याचे काय असे म्हणत पोलीस अधिकाऱ्यांना अजित पवार (Ajit Pawar) यांनी भल्या सकाळी सुनावलं आहे. यामुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, ठेकेदाराला बोलवत पोलिसांची असली काम करतो का म्हणत त्याची कान उघडणी पवारांनी केली आहे.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखांपर्य़त मिळणार बिनव्याजी कर्ज

शिवाजीनगर येथील पुणे पोलीस मुख्यालयाच्या इमारती (police headquarters pune) च्या रिनिव्हेशनच्या कामकाजाची पाहणी व covid मध्ये योगदान दिलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते करण्याचा नियोजित कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने अजित पवार भल्या सकाळी आले होते. त्यावेळी पाहणी करताना हे सगळं घडलं आहे.

कोरोनातून बरे झालेल्या लोकांना व्हॅक्सीनची आवश्यकता नाही; पीएम मोदींना हेल्थ एक्सपर्ट्स सल्ला

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) ओळखले जातात ते त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे.
त्यांच्याकडे कामाच्या बाबतीत कुणाचाच मुलाइजा बाळगला जात नाही.
मग तो पक्षाचा पदाधिकारी असो वा एखादा सरकारी अधिकारी.
नेमकी ही प्रचिती आज पुणे पोलिसांना अनुभवायला मिळाली.
मुख्यालयात आज सकाळी साडे सात वाजता अजित पवार इमारतीच्या रिनिव्हेशनची पाहणी करत होते.

Maratha Reservation | ‘एकच मिशन, मराठ्यांचं ओबीसीकरण’ ! मराठा संघटनेची मागणी

पण, इंजिनिअरच कुठं चुकलं आणि नेमकं काय झाले हे लागलीच पवार यांच्या लक्षात आले आणि त्यांनी थेट अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नावाने बोलवत अशा कामाच्या पाहणीला बोलवलं तर मी लई बारीक बघतो, माझ्या भाषेत बोलायचं तर हे काम ‘छा-छु काम’ आहे. या ठेकेदाराने पोलिसांचाच काम असं केलंय तर मग बाकीच्यांचं काय अस म्हणत आमच्या बारामतीत बघा काम कशी असतात. यावेळी संबंधित ठेकेदाराला देखील बोलवून घेण्यास सांगितले आणि त्याची देखील कान उघडणी पवारांनी केली आहे. भल्यासकाळी अजित पवार यांचे भडकने पाहुन अधिकाऱ्यांची मात्र धांदल उडाली. काय बोलाव आणि काय नाही हेच त्यांना समजत नव्हतं. याची चर्चा मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यापासून पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत सुरू झाली होती.

11 जून राशीफळ : आज मिथुन राशीत चंद्र, 5 राशींमध्ये आनंद, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

Related Posts