IMPIMP

Ajit Pawar Slams Officers In Satara | अजित पवारांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी; म्हणाले – ‘कुठं फेडाल ही पापं ?, कामं तरी चांगली करत चला’

by nagesh
Ajit Pawar | police and officers in mantralaya in the state under tension due to shinde fadnavis government alleges opposition leader ajit pawar

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन – Ajit Pawar Slams Officers In Satara | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते सातारा येथील शासकीय विश्रामगृहाचे (Satara Government Rest House) उद्घाटन करण्यात आले. विश्रामगृहाच्या बांधकामावरून अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावलं असल्याचं समोर आलं आहे. यावेळी त्यांनी आत जाऊन विश्रामगृहाची पाहणी केली. सर्व खोल्यांमध्ये बसवण्यात आलेले डबल बेड, भारंभार बसवण्यात आलेले लाईटचे स्पॉट अशा अनेक गोष्टींवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, त्यांनी चक्क स्वच्छतागृहातील फ्लश व्यवस्थित चालतात की नाही, याचीही पाहणी केली.

सभेदरम्यान बोलताना स्टेजवरूनच अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावले आहे. “शासकीय विश्रामगृहाचं उद्घाटन झालं. पण मला काही ते आवडलेलं नाही. नुतन शासकीय विश्रामगृह चेंबरी.. त्या चेंबरीचा पार चेचाच करून टाकला असल्याचं ते म्हणाले. “मी आता त्या बांधकामाची चौकशी लावणार आहे. मला अधिकाऱ्यांना सांगायचंय की बाबांनो, तुम्हाला आम्ही दीड लाख कोटी रुपये पगार आणि निवृत्ती वेतन देतो. आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या टॅक्सचा तो पैसा असतो. ते करताना कामं तरी चांगली करत चला,” असं ते म्हणाले. (Ajit Pawar Slams Officers In Satara)


अजित पवार पुढे म्हणाले, “कुठं फेडाल ही पापं ? वर गेल्यानंतर तुम्हाला तर नरकातच जावं लागेल.
लोकांनी पण म्हटलं पाहिजे की खरंच त्या सरकारच्या काळात हे काम 1 नंबर झालं.
नाहीतर आम्ही मुंबईला आमच्या घरी पोहोचेपर्यंत इथे काहीतरी तुटलेलं असायचं. काय त्याला करायचंय ? मग त्याबद्दल कारवाई नको का करायला ? काही काही अधिकाऱ्यांना वाटत असतं की हा सारखाच दम देत असतो.
चांगलं काम केल्यानंतर तुमचं कौतुकही करेन ना,” अशा शब्दांत पवार यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली आहे.

Web Title :- Ajit Pawar Slams Officers In Satara | deputy cm ajit pawar slams officers in satara bad construction work rest house

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

MHADA Paper Leak Case | म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांकडून आणखी एकाला अटक

Sanjay Raut on Kirit Somaiya | ‘भाजपा खासदार बृजभूषण सिंह अन् CM योगींबरोबर आम्हीपण जेवायला बसतो’ – संजय राऊत

Weight Loss Tips | तुम्हालाही तुमचे वजन कमी करयाचे असेल, तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; जाणून घ्या

Related Posts