IMPIMP

Sanjay Raut : अमित शाह यांना आम्हीदेखील भेटू शकतो

by pranjalishirish
amit shah sharad pawar secret meeting sanjay raut shivsena

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेनेचे खासदार संजय राऊत  Sanjay Raut  यांनी रविवारी सामनाच्या अग्रलेखातून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका केली आहे. तर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांची अहमदाबाद येथे भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. राष्ट्रवादीने या वृत्ताला नाकारले आहे. तर अमित शाह यांनी, ‘अशा गोष्टी सार्वजनिक स्तरावर बोलायच्या नसतात’, असे बोलत या चर्चेला खतपाणी घातले आहे. या सगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

संतापलेल्या भाजप खासदार बाबुल सुप्रियोंनी थेट कार्यकर्त्यांच्या श्रीमुखात लगावली, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

काय म्हणाले संजय राऊत
काल अमित शाह, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीबद्दल “त्या भेटीत सस्पेंस ठेवण्यासारखं काय आहे? देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार यांच्यात जर भेट आणि चर्चा झाली असेल तर त्यात चुकीचं काय? एखादा मोठा नेता किंवा खासदार गृहमंत्र्यांना भेटला तर त्यात काहीही वावगं नाही. अमित शाह यांना आम्हीही भेटू शकतो. कोणीही भेटू शकतं. ते देशाचे गृहमंत्री आहेत, त्यामुळे अशा भेटींमध्ये काहीही चूक नाही” असे संजय राऊत Sanjay Raut  यांनी म्हटले आहे.

गृहखात्यानंतर आता महसूल खाते भाजपच्या ‘रडार’वर, विखे-पाटलांनी केलं थोरातांच्या खात्याबाबत सूचक वक्तव्य

तसेच “अमित शाह यांनी या भेटीबद्दल बोलताना सांगितलं की काही चर्चा या सार्वजनिकरित्या सांगितल्या जात नाहीत. पण मला असं वाटतं की भेट कितीही गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला तरी कधी ना कधी बंद दाराआडच्या चर्चा सार्वजनिक होतातच. मात्र, एक लक्षात ठेवा की राजकीय बैठका या कधीही गुप्त नसतात. त्या बैठकीमधील चर्चा कधी ना कधी बाहेर येतातच”, असा विश्वासदेखील संजय राऊत  Sanjay Raut यांनी व्यक्त केला आहे.

Video : शरद पवार अन् अमित शहांच्या भेटीच्या चर्चेनंतर भाजपाच्या आमदारानं शेअर केला तो व्हिडीओ, अन्…

“गेल्या काही दिवसात ज्या घटना घडत आहेत, त्यामुळे देशपातळीवर महाराष्ट्राचे नाव खराब झाले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही एका मुलाखतीत याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. मी देखील माझ्या स्तंभात अशाप्रकारचे मत व्यक्त मांडले आहे. महाराष्ट्राला एक प्रतिष्ठा आहे. त्यामुळे राज्याचं नाव खराब झालं हे जरी सत्य असले तरी असे व्हायला नको होतं म्हणून आम्ही कळकळ व्यक्त करतो आहोत. यात कोणतीही वैयक्तिक टीका नाही”, असेसुद्धा संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Also Read

शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द, सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत माहिती

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

निवृत्त न्यायमूर्तींकडून ‘त्या’ प्रकरणाची चौकशी करण्यात येणार !

Related Posts