IMPIMP

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

by pranjalishirish
amruta fadnavis answer congress leader bhai jagtap over axis bank accusations

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर विरोधकांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आहेत. फडणवीस यांना उत्तर देताना, मुंबई पोलिसांची खाती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती. याचे उत्तर द्यावे. असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी उपस्थित केला. त्यावरुन अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे अमृता फडणवीस Amruta Fadnavis यांनी एकेरी उल्लेख करत जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘गोकुळ’चे राजकारण ! मंत्री सतेज पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना दणका

अमृता फडणवीस Amruta Fadnavis यांनी ट्विट करुन भाई जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही UTI बँक/ Axis बँकला योग्यता पाहून दिली होती ! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय !’ असे म्हटले आहे.


…म्हणून फडणवीसांच्या निवासस्थानी सुरक्षाव्यवस्थेत वाढ

काय म्हणाले होते भाई जगताप ?

माझा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सवाल आहे की त्यांनी सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती स्वत:च्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली याचे उत्तर द्यावं. फडणवीस यांनी तब्बल 21 जणांना त्यांच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपातून क्लीनचिट दिली आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत काय बोलणार ? अस भाई जगताप म्हणाले होते. यावर आता अमृता फडणवीस Amruta Fadnavis यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Also Read :

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

67th National Awards : ‘छिछोरे’ बेस्ट हिंदी फिल्म, तर ‘मणिकर्णिका’ साठी कंगनाला बेस्ट अ‍ॅक्ट्रेस अवॉर्ड, पहा संपूर्ण लिस्ट

परमबीर सिंगांचा आणखी एक दावा; आता घेतलं रश्मी शुक्लांचं नाव अन् म्हणाले…

Nana Patole : ‘शेतकरी संघटनांच्या 26 मार्चच्या भारत बंदला काँग्रेसचा सक्रिय पाठींबा’

HM अनिल देशमुख यांच्यासाठी शरद पवार हे ’पावर बँक’ बनण्यामागे काय आहे ‘पॉलिटिक्स’?

‘क्लीनचिट द्यायला शरद पवार न्यायाधीश नाहीत’; पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा टोला

महाविकास आघाडीसोबत 190 आमदार असल्याचा दावा; हसन मुश्रीफ यांनी दिले भाजपला ‘आव्हान’

Related Posts