IMPIMP

अमृता फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाल्या – ‘सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करतंय’

by pranjalishirish
amruta fadanvis slams thackeray government and shivsena over sachin vaze

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. यामध्ये एनआयएने एपीआय सचिन वाझे यांची १३ तास चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सचिन वाझे यांना शनिवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली. या अटकेनंतर भाजप खूप आक्रमक झाली आणि त्यांनी ठाकरे सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. त्यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस amruta fadnavis यांनीसुद्धा या प्रकरणात उडी घेत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस
अमृता फडणवीस amruta fadnavis यांनी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर ठाकरे सरकारवर हल्लबोल केला आहे. त्यांनी टीका करताना महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहे असा गंभीर आरोप देखील केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवरून या संबंधीत ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये “एकीकडे नागपूरसारख्या शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णालयांमध्ये जागा मिळत नाही आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहे. उद्योगपतींना घाबरवून त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी सरकार आपल्या काही खास पंटराकडून योजना आखत आहे” असे म्हणत ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

राम कदम यांची सुद्धा ठाकरे सरकारवर टीका
भाजपाचे नेते राम कदम यांच्याकडून सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे. राम कदम यांनी ठाकरे सरकारवर ट्विटरद्वारे टीका केली आहे. “अनिल देशमुखजी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करा. होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी” असे राम कदम म्हणाले आहे. तसेच “अशी कोणती नावं आहेत ज्यांना महाराष्ट्र सरकार वाचवू पाहत आहे?, नार्को टेस्ट करण्यात यावी जेणेकरून शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल” असेदेखील राम कदम यांनी म्हंटले आहे.

Also Read :

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय

Related Posts