IMPIMP

गृहमंत्री देशमुख यांच्यावरील कथित आरोप प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल, चौकशीसाठी स्वतंत्र यंत्रणा नेमण्याची मागणी

by pranjalishirish
anil deshmukh anil deshmukh alleged corruption drama high court appoint independent mechanism

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – गृहमंत्री अनिल देशमुख  Anil Deshmukh यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी नुकताच केला आहे. या कथित प्रकरणाची सीबीआय, ईडी किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेद्वारे चौकशी करावी, अशा या मागणीसाठी वकिल जयश्री पाटील आणि पुण्यातील हेमंत पाटील यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

गृहमंत्री देशमुख Anil Deshmukh  हे गृहमंत्र्याचे पद संभाळण्याकरिता विश्वासार्ह नसल्याचे उघडकीस आले आहे. ते आपल्या पदाचा गैरवापर करून पोलीस अधिकाऱ्यांना सामान्य माणूस आणि व्यावसायिकांकडून पैसे वसूलीचे आदेश देत असल्याचे जयश्री पाटील यांनी याचिकेत नमूद केले. तसेच पोलीस आयुक्त व विद्यमान गृहरक्षक दलाचे महासंचालक म्हणून निभावलेल्या परमबीर सिंह यांच्या भूमिकेचीही चौकशी करावी, असे याचिकेत म्हटले आहे. देशमुख यांनी वाझेंना दरमहा 100 वसुलीचे टार्गेट दिले होते. तर देशमुख यांच्याविरोधात सिंह यांनी गुन्हा नोंदविला नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फौजदारी गुन्हा नोंदविण्याचा अधिकार आहे. मात्र, सिंह यांनी याप्रकरणात काही कारवाई का केली नाही, याचाही तपास करावा, असे पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे.

फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल

तसेच या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू करावा अन्यथा पुरावे नष्ट करण्याची भीतीही पाटील यांनी व्यक्त केली. तसेच अशीच मागणी करणारी याचिका पुण्याचे हेमंत पाटील यांनीही उच्च न्यायालयात केली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र तपास यंत्रणा नेमून या तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली करावा, तसेच देशमुख Anil Deshmukh , परमबीर सिंह आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आयपीसी कलम 166 अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

Aslo Read : 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवले यांची टीका

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

GROHE Hurun Report : मंगल प्रभात लोढा देशातील सर्वात ‘श्रीमंत’ बिल्डर, जाणून घ्या त्यांच्यासह इतर मोठया ग्रुपच्या संपत्तीबाबत

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

Phone Tapping : मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी मौन का बाळगलंय? संजय राऊतांनी केले स्पष्ट

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले-‘संजय राऊत हे एवढे मोठे नेते नाहीत की मी…’

Related Posts