IMPIMP

Anurag Thakur | ‘अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्या युट्यूब चॅनेल्स अन् वेबसाईटवर बंदी’ – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

by nagesh
Anurag Thakur | ban on youtube channels and websites spreading rumors false information union minister anurag thakur

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Anurag Thakur | ‘अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्या युट्यूब चॅनेल्स (YouTube Channels) आणि वेबसाईटवर (Websites) बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार आणि अफवा पसरविण्याचं काम मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्याचबरोबर अधिकृत मीडिया वेबसाईटसनेच दिलेल्या वृत्तांकनाकडे सत्य म्हणून पाहिले जाते. मात्र, निवडणुकांच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात फेकन्यूज व अफवा पसरवणाऱ्या वेबसाईट तयार केल्या जातात. तर, भारताला बदनाम करण्याचे कारस्थान ठेवूनही काही वेबसाईट काम करतात. याला आता आळा घालण्याचं काम करण्यात येणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत माहिती देताना अनुराग ठाकूर (Anurag Thakur) म्हणाले, ”केंद्र सरकारने (Central Government) काही दिवसांपूर्वीच खोटी माहिती पसरवणे आणि भारताविरोधी षडयंत्र केल्याचा ठपका ठेवत 20 युट्यूब चॅनल्स आणि दोन वेबसाइट्सवर बंदी घातली होती.
आता या निर्णयानंतर केंद्र सरकार अशा वेबसाइट्स आणि युट्यूबवर चॅनेल्सवर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचा इशारा अनुराग ठाकूर यांनी दिला.
तसेच, खोटी माहिती पसरवणाऱ्या वेबसाइट्स आणि युट्यूब चॅनल्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
मला आनंद आहे की जगभरातील मोठ्या देशांनी याची दखल घेतली आहे.
युट्यूबनेही समोर येत असे युट्यूब चॅनल्स ब्लॉक (Block) केले असल्याचे ते म्हणाले.

 

 

दरम्यान, भारतविरोधी आणि खोटी माहिती पसरवण्याचा ठपका ठेवत डिसेंबर 2021 साली वीस युट्यूब चॅनल्स आणि दोन वेबसाइट्सवर (Twenty YouTube Channels And Two Websites) बंदी घालण्यात आली होती.
दरम्यान बंदी घातलेले युट्यूब चॅनल्स आणि वेबसाइट्स पाकिस्तानमधून चालवले जात होते.
ते भारताबाबत संवेदनशील विषयांवर खोटी माहिती पसरवत होते.
या वेबसाइट्स आणि युट्यूब चॅनल्सवर काश्मीर, भारतीय सैन्य, भारतातील अल्पसंख्याक समुह, राम मंदीर, जनरल बिपीन रावत अशा विषयांवर विभाजनकारी माहिती पसरवली जात होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Anurag Thakur | ban on youtube channels and websites spreading rumors false information union minister anurag thakur

 

हे देखील वाचा :

Allu Arjun Film | ‘पुष्पा’ नंतर अल्लू अर्जुनचा 2020 चा चित्रपट प्रजासत्ताक दिनी होणार हिंदीत प्रदर्शित, पहा चित्रपटाचा टीझर

Anil Deshmukh | दिलासा नाहीच ! अनिल देशमुखांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ

Kolhapur Crime | न्यायाधिशांच्या कुटुंबातील महिलांचे कपडे ‘तो’ चोरायचा, पकडल्यानंतर धक्कादायक कारण आलं समोर

 

Related Posts