IMPIMP

Anil Deshmukh | दिलासा नाहीच ! अनिल देशमुखांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ

by nagesh
Anil Deshmukh | anil deshmukh writes letter to chief minister eknath shinde to start katol civil court

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Anil Deshmukh | राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) जवळपास 80 दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) आहेत. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान आज न्यायालयाकडून देशमुख यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांनी वाढ करण्यात आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

10 जानेवारीला न्यायालयानं देशमुखांच्या कोठडीत 10 दिवसांची वाढ केली होती. त्यानुसार आज (गुरूवारी) त्यांची कोठडी संपणार होती. परंतु, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे. सध्या अनिल देशमुख हे ऑर्थर रोड तुरुंगात (Arthur Road Prison) आहेत. दरम्यान, मंगळवारी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जामीन अर्ज फेटाळण्याबाबतचा निर्णय विशेष पीएमएलए न्यायालयाने (Special PMLA Court) दिला होता. सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रानंतर अनिल देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र देशमुखांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली. आता देशमुख यांना आणखी 14 दिवस तुरूंगातच राहावं लागणार आहे.

 

 

दरम्यान, मुंबई माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप केले होते.
त्यानंतर त्यांच्या घरावर ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि आयकर विभागाने (Income Tax Department) छापेमारी केली.
देशमुख बरेच दिवस अज्ञातवासात होते. शेवटी ते स्वतःच ED कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली होती.

 

 

Web Title :- Anil Deshmukh | anil deshmukh custody increased 14 days by court in money laundering case

 

हे देखील वाचा :

Kolhapur Crime | न्यायाधिशांच्या कुटुंबातील महिलांचे कपडे ‘तो’ चोरायचा, पकडल्यानंतर धक्कादायक कारण आलं समोर

Budget 2022 | अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांसाठी चांगली बातमी, जाणून घ्या तुम्ही कसा घेऊ शकता लाभ?

PPF | रोज 250 रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर मिळतील 62 लाख, जाणून घ्या संपूर्ण योजना

 

Related Posts