IMPIMP

खासदार नवनीत राणांना मोठा झटका, मुंबई HC कडून जात प्रमाणपत्र रद्द, खासदारकी धोक्यात

by omkar
Navneet Rana

मुंबईः सरकारसत्ता ऑनलाइन –  युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र हे खोटे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हायकोर्टाने हे प्रमाणपत्र रद्द केले आहे. तसेच कोर्टाने त्यांना 2 लाखांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने राणा यांना मोठा धक्का बसला असून खासदारकी धोक्यात आली आहे.

Ahmednagar News | …म्हणून 70 वर्षांच्या आजींनी थोपटली भाजप खासदार डॉ. सुजय विखेंची पाठ

खासदार राणा यांचे जात वैधता प्रमाणत्र खोट असल्याबाबत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता.
या प्रकरणाचा निकाल मंगळवारी (दि. 8) न्यायालयाने घोषित केला आहे न्यायालयाने हा घटनेवरील घोटाळा आहे, असे मत नोंदवून सदर जात प्रमाणपत्र रद्द करून राणां यांना 2 लाखाचा दंड ठोठावला आहे. तसेच सदरचं खोटं जात प्रमाणपत्र 6 आठवड्याच्या आत शासनाला जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आनंदराव अडसुळ यांच्या वतीने ॲड.सी.एम्.कोरडे, ॲड.प्रमोद पाटील व ॲड.सचिन थोरात यांनी बाजू मांडली. जातप्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे नवनीत राणा यांना मोठा धक्का मानला जात आहे.

Also Read:- 

भाजपचे खासदार गिरीश बापट यांची ठाकरे सरकारकडे मागणी, म्हणाले – ‘राज्याच्या तिजोरीतून लस खरेदीसाठी तयारी दाखवलेले 7 हजार कोटी गरिबांना द्या’

12 वीच्या निकालानंतर प्रथम वर्ष प्रवेशाबाबतचा निर्णय तातडीने घेऊ : मंत्री उदय सामंत

खुशखबर ! मोदी सरकार शेतकर्‍यांना देतंय वार्षिक 42000 रुपये, जाणून घ्या तुम्हाला कसा मिळेल फायदा

  COVID-19 in India : देशात 63 दिवसानंतर एक लाखापेक्षा कमी कोरोना केस, एकुण मृत्यूंचा आकडा 3.5 लाखांच्या पुढे

प्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सुद्धा अनेक लोकांमध्ये का दिसत नाही कोणतेही लक्षण? रिसर्चमध्ये समोर आली बाब

 

Related Posts