IMPIMP

Sachin Vaze : स्कॉर्पिओला अंबानींच्या जॅग्वारची नंबर प्लेट ? सचिन वाझेंचे पाय आणखी खोलात ?

by bali123
big news : mukesh ambani security scare jaguar registration plate suv sachin vaze

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएकडून कसून तपास सुरू आहे. एनआयएने मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी सचिन वाझे sachin vaze यांना या प्रकरणात अटक केली आहे. सचिन वाझे sachin vaze यांना एनआयए न्यायालयाने 11 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर त्यांना पोलीस सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आले. सचिन वाझे sachin vaze यांच्यावर निलंबनाची झालेली ही दुसरी कारवाई आहे. एनआयएकडून करण्यात येत असलेल्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत मोठी वाढ होत आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारी रोजी एक स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला. NIA ने या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर सचिन वाझे यांची शनिवारी तब्बल 13 तास चौकशी केली. चौकशीनंतर वाझे यांना अटक केली. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात महत्त्वाची माहिती एनआयएच्या हाती लागली आहे.

अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीची नंबर प्लेट बदलण्यात आली होती. नव्या नंबर प्लेटवरील क्रमांक हा एका जॅग्वार गाडीचा असल्याचे तपासात समोर आले. एवढेच नाही तर हा क्रमांक ज्या जॅग्वार गाडीचा आहे, ती जॅग्वार गाडी अंबानी यांच्या मालकीची असून, या गाडीचे मालक मुकेश अंबानी असल्याचे तपासात समोर आले आहे. स्फोटकाने भरलेल्या गाडीचा नंबर आणि अंबनी यांच्या जॅग्वार गाडीचा नंबर एकसारखाच आहे. यासंबंधीचे वृत्त एका हिंदी वेबसाइटने दिले आहे.

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी वेबसाइटला दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबनी यांच्या सुरक्षेचा ताफा मोठा आहे. अंबानी यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात असलेल्या एका जॅग्वार गाडीचा क्रमांक आणि स्कॉर्पिओचा क्रमांक एकसारखा आहे. एका अनोळखी व्यक्तीने स्फोटकाने भरलेली स्कॉर्पिओ अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केली. या व्यक्तीने आपली ओळख लपवण्यासाठी पीपीई किट घातले होते. आता ही व्यक्ती सचिन वाझे होती की आणखी कोणी, याचा शोध एनआयएकडून केला जात आहे.

PPE किट घातलेली व्यक्ती वाझे की आणखी कुणी ?, NIA वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार, गूढ उलगडणार?

शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेते अन् मंत्र्याची बैठक, ‘या’ 3 महत्वाच्या प्रकरणांचा घेणार आढावा

मधुकर पिचड पडणार एकाएकी? राष्ट्रवादी खेळतोय ‘ही’ खेळी

Related Posts