IMPIMP

PPE किट घातलेली व्यक्ती वाझे की आणखी कुणी ?, NIA वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार, गूढ उलगडणार?

by pranjalishirish
big news : nia probing if mumbai police officer sachin vaze was present mukesh ambani house antilia

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास करताना एनआयएच्या हाती काही भरभक्कम पुरावे लागले आहेत. त्यामुळे पोलीस अधिकारी सचिन वाझे sachin vaze यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेली स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची असल्याचे तपासात समोर आले. यानंतर काही दिवसांनी मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला. यामध्ये सचिन वाझे यांच्यावर आरोप झाल्यानंतर एनआयएने या प्रकरणाचा तपास करून वाझे यांची चौकशी केली. चौकशीनंतर वाझे यांना एनआयएने अटक केली.

सचिन वाझे sachin vaze  यांना अटक केल्यानंतर एनआयएने पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार जप्त केली. सध्या वाझे हे एनआयएच्या कोठडीत आहेत. मुकेश अंबानींच्या घराबाहेर मध्यरात्री इनोव्हा कारमधून एक व्यक्ती उतरली होती. ती व्यक्ती नेमकी कोण याचा तपास एनआयए करत आहे. इनोव्हातून उतरलेल्या व्यक्तीने पीपीई किट घातल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यामुळे ही व्यक्ती वाझे होती की, आणखी कोणी ? याचा तपास एनआयए करत आहे.

अंबानींच्या घराबाहेर दिसलेल्या इनोव्हा कारमधून उतरलेल्या व्यक्तीने ओळख लपवण्यासाठी पीपीई किट घातले होते. ही व्यक्ती सचिन वाझे sachin vaze होती का, हे पडताळून पाहण्यासाठी एनआयएचे अधिकारी वाझे यांना पीपीई किट घालून चालायला सांगणार आहेत. चालण्याच्या पद्धतीवरून काही गोष्टी एनआयएच्या हाती लागण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने एनआयएकडून तपास केला जात आहे.

वाझेंच्या विरोधात NIA कडे पुरावे

अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयए करीत असून, एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली आहे. एनआयएला सचिन वाझे यांच्या विरोधात भरभक्कम पुरावे मिळाले आहेत. वाझे वापरत असलेली गाडी 24 फेब्रुवारी आणि 13 मार्चला मुंबईतल्या पोलीस मुख्यालयातून बाहेर पडताना दिसत आहे. हे दोन्ही सीसीटीव्ही फुटेज एनआयएने ताब्यात घेतले आहेत. याशिवाय वाझे वापरत असलेली गाडी 24 फेब्रुवारीला ठाण्यात गेली होती. याच दिवशी कारची नंबर प्लेट बदलली असावी, असा संशय एनआयएला आहे.

Also Read : 

भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी कामिनी पाटील

Related Posts