IMPIMP

शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेते अन् मंत्र्याची बैठक, ‘या’ 3 महत्वाच्या प्रकरणांचा घेणार आढावा

by pranjalishirish
sharad pawar called an important meeting of ministers and mlas at mumbai

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील वादग्रस्त प्रकरण आणि सरकारची मलिन होत असलेली प्रतिमा या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार sharad pawar यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याची आणि मंत्र्यांची महत्वाची बैठक सोमवारी (दि. 15) बोलावली आहे. मुंबई येथे सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात ही बैठक होणार आहे.

धनंजय मुंडे, संजय राठोड, सचिन वाझे प्रकरण तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात सेना राष्ट्रवादीमध्ये झालेली रस्सीखेच या सर्व गोष्टींचा आढावा शरद पवार sharad pawar आजच्या बैठकीत घेणार आहेत. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामुळे राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबळ उडाली होती. पण मुंडेवर आरोप केलेल्या तरुणीने गुन्हा मागे घेतल्याने मुंडेना दिलासा मिळाला. त्यानंतर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. अधिवेशनात भाजपने आक्रमक होत कायदा आणि सुरक्षेच्या मुद्यावर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. स्फोटकांनी भरलेले कार प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक खुलासे केले. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख आणि फडणवीस यांच्यात खडाजंगी झाली. या प्रकरणात एनआयएने वाझेंना अटक केल्याने ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे आता शरद पवार sharad pawar यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.

Also Read : 

भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी कामिनी पाटील

मधुकर पिचड पडणार एकाएकी? राष्ट्रवादी खेळतोय ‘ही’ खेळी

जळगाव महापालिकेत राजकीय भूकंप, भाजपचे 27 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला

भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘ताजमहालचे नाव बदलून राम महल करणार’

Related Posts