IMPIMP

चंद्रकांत पाटलांनी NIA कोठडीत घेतली सचिन वाझेंची भेट ? उत्तर देत भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

by pranjalishirish
chandrakant patil | pune bjp mla chandrakant patil reaction on alliance with mns in press conference

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर सचिन वाझे यांनी NIA च्या कोर्टात सादर केलेल्या पत्रावरुन राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सचिन वाझेंनी लिहिलेल्या पत्रात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil  यांनी एनआयए कोठडीत सचिन वाझे याची भेट घेतल्याच्या आरोपाला उत्तर दिले आहे. ते मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Pandharpur : दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेणार, अजित पवारांचे व्यापाऱ्यांना आश्वासन

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील  Chandrakant Patil म्हणाले, सचिन वाझे हे महावसुली आघाडीचे किती प्रिय.. महाराष्ट्र विधानसभेत ज्यावेळी मनसुख हिरेन प्रकरणाचा विषय निघाला त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना निलंबित करण्याची मागणी केली. मग यावरुन लॉंग लिव्ह पर्यंत आलो त्यानंतर आम्ही पदावरुन दूर करण्यावर आलो. नऊ वेळेला विधानसभा स्थगित करावी लागली. म्हणजे केवढं प्रेम तुमचं वाझेंवर.. प्रचंड..एक मिनिट विधानसभेचं जाणं म्हणजे काही लाखो, करोडो रुपयांचं नुकसान, पूर्ण दिवस सदन चाललं नाही.

माझे मौन हे कुणी कमजोरी समजू नये’, दवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले

पण दुसऱ्या दिवशी गृहमंत्र्यांनी घोषणा न करता संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली. अनिल परब यांचं म्हणणं आहे की, एका मंत्र्याचं नाव येणार आहे हे तुम्हाला कसं कळलं वगैरे याची सुरुवात तिथे आहे. नऊ वेळा सभागृह स्थगित झाल्यानंतर तुम्ही काही केलं नाही इतके वाझे तुम्हाला प्रिय.. त्या वाझेंवर तुमचा इकता अविश्वास की म्हणे माझी आणि वाझेंची भेट झाली असेल. आता एनआयएच्या कोठडीत मी कशाला जाऊ, मी गिरणी कामगाराचा मुलगा, गिरण भागात आमचं घर आणि मी एनआयए कोठडीत जाऊन सचिन वाझेंची भेट घेतली आणि त्यांना परबांचं, पवारांचं नाव लिहा असं म्हटलं हे हस्यास्पद आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Keshav Upadhye : ‘…पण शरद पवारांना खोटं पाडू नका’

यावेळी बोलताना त्यांनी पुढील 15 दिवसांत सरकारच्या आणखी दोन -तीन मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची वेळ येईल असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. पुढील 15 दिवसांत अजून मंत्री राजीनामे देतील. मला नावं विचारु नका. कोणीतरी न्यायालयात जाईल आणि त्यानंतर अनिल परब यांना राजीनामा द्यावा लागेल, असेही चंद्रकांत पाटील Chandrakant Patil म्हणाले.

Read More : 

Coronavirus : न्यूझीलंडने भारताबाबत घेतला मोठा निर्णय, 28 एप्रिलपर्यंत ‘नो एंट्री’

Chitra Wagh : ‘ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’

सचिन वाझेंच्या पत्रावरून फडणवीस म्हणाले; ‘पत्र गंभीर…

Chandrakant patil : ‘केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय’

संभाजी भिडे यांची जीभ घसरली, म्हणाले – ‘कोरोना अस्तित्वात नाही, जे जगायचे ते जगतील अन् मरायचे ते मरतील’

महाराष्ट्रापेक्षा गुजरातला लसीचा पुरवठा अधिक, राजेश टोपेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

‘महाराष्ट्राला सर्वात जास्त लसी मिळायला हव्यात, मात्र मुद्दाम दिल्या जात नाहीत’, जयंत पाटलांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

‘खंडणीचे आरोप निराधार, माझी नार्को टेस्ट करा’ ! परब यांचे आव्हान

शरद पवारांची केंद्र सरकारसोबत चर्चा, केंद्र सरकारने दिले ‘हे’ आश्वासन

Related Posts