IMPIMP

भाजपचे खासदार गिरीश बापट यांची ठाकरे सरकारकडे मागणी, म्हणाले – ‘राज्याच्या तिजोरीतून लस खरेदीसाठी तयारी दाखवलेले 7 हजार कोटी गरिबांना द्या’

by omkar
Girish Bapat

पुणे – सरकारसत्ता ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. देशातील १८ वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी मोदींनी घेतली आहे. तसेच एकरकमी धनादेश देऊन लसखरेदी करण्याची तयारी दाखवली होती. ठाकरे सरकारने या वाचलेल्या सात हजार कोटींच्या निधीतून आता गोरगरीब जनता, शेतकरी, बारा बलुतेदार, रिक्षा-टॅक्सीचालक, मजूर, केश कर्तनालयांचे चालक तसेच टाळेबंदीच्या काळात रोजगारास मुकलेल्या सर्वांकरिता तातडीने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे खासदार Girish Bapat गिरीश बापट Girish Bapat यांनी पत्रकाद्वारे ठाकरे सरकारकडे केली आहे.

12 वीच्या निकालानंतर प्रथम वर्ष प्रवेशाबाबतचा निर्णय तातडीने घेऊ : मंत्री उदय सामंत

केंद्र सरकारने देशातील लसीकरण मोहिमेची सूत्रे हाती घेतल्याने राज्यातील लसीकरणाचा खेळखंडोबा संपणार आहे.

सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने स्वतः उचलल्याने देशातील जनतेस मोठा दिलासा मिळणार आहे, असे स्पष्ट करून बापट यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार व्यक्त केले आहेत.

आता महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेस आर्थिक संकटात दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सात हजार कोटींचे पॅकेज द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

केंद्र सरकारने राज्यांना लस खरेदीची मुभा दिल्यानंतर महाराष्ट्राकरिता एकरकमी धनादेश देऊन १२

कोटी लस मात्रा विकत घेण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते.

पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेली मोफत लसीकरण मोहीम राबविण्यासाठी राज्य सरकारने लसीकरणाचा नियोजनबद्ध कार्यक्रम जाहीर करून केंद्राच्या मोहिमेस सहकार्य करावे व राजकारण न करता जनतेच्या जीवित रक्षणास प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले आहे.

ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजची दमडीदेखील अजूनही कोणाच्याच खात्यात जमा झालेली

नसल्याने जनतेमध्ये तीव्र संताप पसरला असून त्याचा उद्रेक होण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

आता लस पुरवठ्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने उचलल्याने या धनादेशाचा वाचलेला सुमारे

सात हजार कोटींचा निधी राज्य सरकारने तातडीने गोरगरीब जनतेकरिता तातडीने वितरित करावा व

गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जनतेस दिलासा द्यावा असे बापट म्हणाले.

Also Read:- 

खुशखबर ! मोदी सरकार शेतकर्‍यांना देतंय वार्षिक 42000 रुपये, जाणून घ्या तुम्हाला कसा मिळेल फायदा

  COVID-19 in India : देशात 63 दिवसानंतर एक लाखापेक्षा कमी कोरोना केस, एकुण मृत्यूंचा आकडा 3.5 लाखांच्या पुढे

प्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सुद्धा अनेक लोकांमध्ये का दिसत नाही कोणतेही लक्षण? रिसर्चमध्ये समोर आली बाब

  नोकरदारांसाठी मोठी बातमी ! लवकरच पगारातील PF कपात वाढणार, जाणून घ्या काय आहे सरकारचा प्लॅन

WHO चा भारताला इशारा ! डेल्टा व्हेरिएंटचा उल्लेख करून म्हटले – ‘घाईगडबडीत हटवू नयेत प्रतिबंध’

 

Related Posts