IMPIMP

Chandrakant Patil | ‘मुख्यमंत्री उध्दव ठाकरे खासगी रुग्णालयात, सरकारी व्यवस्थेवर विश्वास नाही का?’

by nagesh
Chandrakant Patil On Mahavikas Aghadi Govt | ministers in mahavikas aghadi should fill their bags chandrakant patil in kolhapur

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन –  मानेचं दुखणं बळावल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. यावरुन भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टोला लगावला आहे. मुख्यमंत्री खासगी रुग्णालयात गेलेत, सरकारी व्यवस्थेवर विश्वास नाही का ? देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोना झाला तेव्हा ते सरकारी रुग्णालयात
उपचार घेत होते. आता मुख्यमंत्री जिथे कुठे आहेत तिथे त्यांनी निवेदने स्वीकारावेत, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटले आहे. तसेच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरुन (Petrol and diesel price hike) आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना त्यांनी सुनावले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, महाराष्ट्रात सत्तेत असणारे पक्ष पेट्रोल डिझेलवरचे कर कमी करावेत यासाठी आंदोलन करतात. नाना पटोले (Nana Patole) सायकलवरुन, अमित देशमुख (Amit Deshmukh) बैलगाडीने हे नुसते स्टंट, आता केंद्राने पेट्रोल डिझेलचा अबकारी कर (Excise tax) कमी केला. त्यानंतर पेट्रोल डिझेलच्या दरात 5 आणि 10 रुपयांनी कमी झाले. 11 हून अधिक राज्यांनी दर कमी केले आहेत. त्यांनी व्हॅट कमी केला. महाराष्ट्राचा पेट्रोलवर 24 टक्के आणि सेस 9 टक्के आहे. दुष्काळ, भूकंपाचा सेस आहे. केंद्राने कर कमी केला मग तुम्ही का करत नाही, असा प्रश्न त्यांनी ठाकरे सरकारला (Thackeray government) विचारला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून (ST Workers Agitation) चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला.
या सरकारच्या काळात लोकांचे संसार देशोधडीला लावला जात आहे. कर्मचाऱ्यांना निलंबित केले जात आहे.
यावर बोलताना मेस्मा कायद्याने (Mesma law) नोटिसा कसल्या बजावता, असा सवाल त्यांनी केला.
तसेच विलिनीकरणाला वेळ लागेल असे म्हणातय. कर्मचाऱ्यांचे 17 महिन्यापासून पगार दिलेला नाही, असेही पाटील म्हणाले.

 

Web Title: Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil criticism on st workers protest state to state government in kolhapur

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau Pune | पुणे महापालिकेचा आरोग्य निरीक्षक लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

Pune News | इंटेलिजन्स ब्युरोचे माजी संचालक विद्याधर वैद्य यांचे पुण्यात निधन

Nilofar Malik | नवाब मलिकांची मुलगी निलोफर यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस, माजी मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढणार?

 

 

Related Posts