IMPIMP

Pune News | इंटेलिजन्स ब्युरोचे माजी संचालक विद्याधर वैद्य यांचे पुण्यात निधन

by nagesh
Pune News | Ex-Director of Intelligence Bureau passes away in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | इंटेलिजन्स ब्युरोचे माजी संचालक (Ex-Director of Intelligence Bureau ) विद्याधर गोविंद वैद्य (Vidyadhar Govind Vaidya) यांचे वृद्धापकाळामुळे आणि दीर्घ आजाराने (prolonged illness) पुण्यात (Pune News) निधन (Passed away) झाले. ते 85 वर्षांचे होते. आज (गुरुवार) सकाळी 6.45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा अविनाश वैद्य, तुषार वैद्य असा परिवार आहे. अविनाश वैद्य हे नागपूरमध्ये आहेत तर दुसरा मुलगा तुषार वैद्य हे शारजा मध्ये आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

विद्याधर वैद्य यांचा जन्म 22 जानेवारी 1936 मध्ये बुरहानपूर (Born in Burhanpur) येथे झाले. त्यांचे शिक्षण पर्टवर्धन हायस्कूल आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपूर येथे झाले. विद्याधर वैद्य हे 1958 मध्ये भारतीय पोलीस सेवेत (Indian Police Service) रुजू होण्यापूर्वी विज्ञान संस्थेत गणिताचे व्यख्याता म्हणून त्यांनी काम पाहिले.

 

1994 मध्ये 36 वर्षाच्या उत्कृष्ट कार्याकाळानंतर ते इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक पदावरून निवृत्त झाले. वैद्य यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (President Police Medal) आणि भारतीय पोलीस पदक (Indian Police Medal) मिळाले आहे. तसेच देशातील सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले. (Pune News)

 

Web Title : Pune News | Ex-Director of Intelligence Bureau passes away in Pune

 

हे देखील वाचा :

Earn Money | सरकारी बँकांसोबत काम करून दरमहा कमावू शकता 5000 रुपये, जाणून घ्या कुठे आणि कसा करावा अर्ज?

Nilofar Malik | नवाब मलिकांची मुलगी निलोफर यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस, माजी मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढणार?

निवडणूक आयोगाकडे ऑनलाइन Voter ID Card अर्जाची स्थिती अशी जाणून घ्या; ‘या’ 3 तीन पद्धतींचा करा वापर

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आलेला आणखी एक निर्णय रद्द

Ileana Dcruz | पहिल्यांदाच झळकणार विद्या बालन आणि इलियाना डिक्रूझची जोडी! अभिनेत्रीनं वेगळ्याच अंदाजात व्यक्त केला आनंद

 

Related Posts