IMPIMP

Chandrakant Patil | ‘मुश्रीफ यांनी ड्रामा बंद करावा’ – चंद्रकांत पाटील

by nagesh
Chandrakant Patil | mushrif did not have bjps offer he should stop drama revealed chandrakant patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन   – Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी मला भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. असं मोठं विधान राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी केलं होतं. या विधानावरुन आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुश्रीफांना मी अशी कोणतीही ऑफर दिली नव्हती. त्यांनी ड्रामा करणं बंद करावं, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. त्यावेळी पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, हसन मुश्रीफांना (Hassan Mushrif) कोणतीही ऑफर नव्हती.
एखाद्याला ऑफर दिली आणि त्यांनी ती नाकारली तर ती मेरिटवर नाकारतात कुणालाही त्रास देण्याचं कल्चर आमचं नाही.
मुश्रीफांनी हा सगळा ड्रामा बंद करावा, असं स्पष्टंच चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.
पुढं ते म्हणाले, मुश्रीफ यांना सांगायचंय पॅनिक होऊन काही होत नसत.
कारवाई झाल्यानं आणि घोटाळे बाहेर पडत असल्याने मुश्रीफांचा ड्रामा सुरु आहे.
अमुक-तमुक करणार, माझे हितचिंतक रस्त्यावर येणार, कुठलीतरी परिस्थिती दाखवायची, मला त्यांना सांगायचंय, ड्रामा बंद करा, कायद्याची लढाई कायद्याने लढा, असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफांना दिलंय.

दरम्यान, माझं आंबाबाईला साकडं आहे की मुश्रीफ बरे झाले पाहिजे.
त्यांनी पॅनिक नको व्हायला हसन मुश्रीफ यांना माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही.
माझ्या विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा करू शकतात. अनिल देशमुख यांच्यावर ED ची कारवाई झाली पण ते माहिती देत देत सहकुटुंब गायब झाले. तसाच मार्ग मुश्रीफ यांच्याकडे असल्याचं, त्यांनी म्हटलं आहे.

 

काय म्हणाले होते मुश्रीफ?

चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला, हे भुईसपाट कुणामुळे झालं, तर मुश्रीफांमुळे, त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली.
मी त्यांना ठणकावून सांगितलं, पवार एके पवार. त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली, आता महाविकास आघाडी प्रबळ झाली आहे.
त्यांच्यासमोर भाजपला यश मिळत नाही, त्यामुळे हे सुरु आहे, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Chandrakant Patil | mushrif did not have bjps offer he should stop drama revealed chandrakant patil

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पिंपरीत स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट, पोलिसांकडून पर्दाफाश, 4 तरुणींची सुटका

Punjab New CM | पंजाबचे नवे CM चरणजीत सिंह चन्नी; 2 उपमुख्यमंत्र्यांसह घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Goa Accident | गोव्याच्या खाडीत कार बुडून भीषण अपघात ! पुण्यातील शुभम देडगे व ईश्वरी देशपांडेचा मृत्यू

 

Related Posts