IMPIMP

Chandrakant Patil | ‘कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी मी मोदींना विनंती करणार’ – चंद्रकांत पाटील

by nagesh
Chandrakant Patil | chandrakant patil on central government order about maharashtra chief minister

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Chandrakant Patil | केंद्र सरकारने (Central Government) आणलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी याबाबत घोषणा आज (शुक्रवारी) केली आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा हा कायदा सरकारने चांगल्या हेतूने आणला होता, मात्र, काही शेतकऱ्यांना पटवण्यात आम्ही अपयशी ठरलो असं मोदी म्हणाले. यावरुन देशभरातून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यानंतर आता भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

‘मी पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) विनंती करेल की शेतकऱ्यांना समजवून पुन्हा ते कायदे आणले पाहिजे’, असं चंद्रकांत पाटील
(Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जो चांगला दर मिळण्याचा आनंद मिळणार होता
ते कायदे पर्याय नसल्यामुळे मोदींना मागे घ्यावे लागत आहे. अनेक महिने आंदोलन चालू आहे. देशातील अनेक शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांना हे
कायदे मान्य आहेत. पण एक विशिष्ट गट हा विषय घेऊन देशभर अडथळे निर्माण करत होता. कायद्यावर स्थगिती असताना तुम्ही आंदोलन का करत
आहात असं सर्वाेच्च न्यायालयाने अनेक वेळा झाडले. इतरांना वेठीस धरुन स्वतःच्या मागण्या मान्य करुन घेऊ शकत नाहीत असं न्यायालयाने
म्हटल्यावरही ऐकले गेले नाही. त्यामुळे मोदींनी ही घोषणी केली, असं ते म्हणाले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘मी स्वतः महाराष्ट्राचा कृषीमंत्री, पणनमंत्री होतो. यातल्या एक कायद्यामध्ये मार्केटच्या बरोबरीने मार्केटच्या बाहेर विकायची
परवानगी देण्यात येणार होती. यात चुकीचे काय होते? या देशात काही चांगले असले की मोदींना विरोध. त्यांच्या निर्णयांना विरोध मग ते सर्वसामान्यांच्या
हिताचे असले तरी चालतील. त्यामुळे एका छोट्या गटाला पटवून देण्यामध्ये आम्हाला अपयश आल्याचे मोदींने म्हटले. देशामधील अशांतता
संपवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले. मी मोदींना विनंती करेल की शेतकऱ्यांना समजवून पुन्हा ते कायदे आणले पाहिजे,” असं पाटील
(Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Chandrakant Patil | will urge pm narendra modi to bring back agricultural laws bjp chandrakant patil

 

हे देखील वाचा :

Satej Patil Net Worth | कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे तब्बल ‘इतक्या’ कोटींची मालमत्ता; 16 कोटी 53 लाखांचे कर्ज

Nawab Malik | PM मोदींनी 3 कृषी कायदे मागे घेतल्यानंतर नवाब मलिकांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘निवडणुकांतील पराभवाच्या भितीनं…’

Former MLA Mohan Joshi | शेतकऱ्यांच्या लढ्याचा विजय अन् PM मोदींच्या अहंकाराचा पराभव – माजी आमदार मोहन जोशी

 

Related Posts