IMPIMP

Chitra Wagh | ‘आबांची नाळ जनतेशी कायम जोडलेली असायची, रोहित तुझं खूप अभिनंदन’ – चित्रा वाघ

by nagesh
Chitra Wagh | pune chitra wagh congrats rohit patil after victory of nagarpanchayat election in sangli

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Chitra Wagh | राज्यातील 106 नगरपंचायती निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या दरम्यान सांगलीच्या (Sangli) कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत (Kavthemahankal Nagar Panchayat Result) राष्ट्रवादीनं (NCP) आपला झेंडा फडकवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील (Rohit R. Patil) यांनी राजकारणात यशस्वीरीत्या आपली एन्ट्री केली आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्यावर राष्ट्रवादी समर्थकांनी जल्लोष केला आहे. विशेष म्हणजे या विजयानंतर रोहित पाटीलचे सर्वत्र कौतुक होत आहे. यानंतर आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील रोहित पाटीलचे जाहीर अभिनंदन केलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनलला 10, तर शेतकरी विकास पॅनलला 6 जागांवर विजय मिळाला. तर एका जागी अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. या विजयानंतर रोहित पाटील यांना दिवंगत नेते आणि वडिल आर.आर. पाटील यांची आठवण झाली. त्याचबरोबर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील आर. आर. पाटील यांच्या आठवणी जागवत रोहित पाटील यांचं कौतुक केलं आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, ”रोहित तुझं खूप अभिनंदन. कोणतं पद असो की नसो, आबांची नाळ जनतेशी कायम जोडलेली असायची. आबांच्या पावलांवर पाऊल टाकत तू हा जनसेवेचा वारसा पुढे सुरू ठेवला. त्याचं फळ तुला आज मिळालंय. हे यश तुझं आहे, आज आबा असते तर त्यांना तुझा अभिमान वाटला असता,” असं त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे.

विजयानंतर रोहित पाटील काय म्हणाले ?
कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला अभूतपूर्व विजय आपण मिळवून दिलात.
विजयानंतर खऱ्या अर्थाने जबाबदारी वाढते, कवठेमहांकाळ आणि परिसराच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत.
तसेच, सर्वच नागरिकांचे आभार मानत आज स्वर्गीय आबांची आठवण मनात दाटून येत आहे.
आबांनाही नक्कीच आजच्या विजयाचा आनंद झाला असेल, असं रोहित पाटील (Rohit Patil) यांनी म्हटलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : Chitra Wagh | pune chitra wagh congrats rohit patil after victory of nagarpanchayat election in sangli

हे देखील वाचा :

Pune Corporation | पुणे मनपाच्या आकाशचिन्ह विभागाने शहरातील 42000 बेकायदा फ्लेक्स, बॅनर हटविले

Uttarakhand Election 2022 | दिवंगत जनरल बिपीन रावत यांचे भाऊ निवृत्त कर्नल विजय रावत यांचा भाजपमध्ये प्रवेश

Pune Crime | सुरक्षा रक्षक बनले ‘देवदूत’, डॉ. सतीश चव्हाण यांच्या अपहरण झालेल्या ‘स्वर्णव’ला सुखरुप पोहचवलं पालकांकडे

Related Posts