IMPIMP

  Congress Leader Sachin Pilot : भाजपवासी झालेल्या ‘या’ महिला नेत्याचा मोठा दावा, म्हणाल्या – ‘सचिन पायलट यांच्याशी बोलणं झालंय, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील’

by omkar
Sachin Pilot
नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन – राजस्थानातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री Sachin Pilot सचिन पायलट sachin pilot यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यात हा भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसला जोरदार धक्का आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रसाद यांनी पक्षाला रामराम केला. आणि उत्तर प्रदेशात आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेसच्या समस्यांमध्ये भर पडली. जितिन प्रसाद यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. २५ वर्षे काँग्रेसमध्ये राहिलेल्या आणि नंतर भाजपवासी झालेल्या रिटा बहुगुणा जोशींनी तसा दावा केला आहे.

फायद्याची गोष्ट ! पीपीएफ अकाऊंटमध्ये 10 वर्षाच्या मुलांच्या नावाने दरमहा 500 रूपये जमा करून 28 लाख मिळवण्याची संधी, जाणून घ्या

दरम्यान, राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी काल दुपारी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं पक्षात स्वागत केलं.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जितिन प्रसाद भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.

CoWin Vaccination Update : व्हॅक्सीन सर्टिफिकेटमध्ये काही चूक असेल तर घरबसल्या करा सुधारणा, ‘ही’ आहे पद्धत

पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताची निर्मिती करत आहेत. या कार्यात योगदान देण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असं प्रसाद यांनी पक्षप्रवेशानंतर सांगितलं.

रिटा बहुगुणा जोशी म्हणाल्या, “पायलट लवकरच भाजपमध्ये येतील. माझं त्यांच्याशी फोनवरून बोलणं झालं आहे.

Coronavirus : मुलांच्या उपचाराची गाईडलाईन जारी, होणार नाही रेमडिसिविरचा वापर

काँग्रेस पक्ष आता उत्तर भारतात संपल्यात जमा आहे. सचिन पायलट काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं समजतं. काही महिन्यांपूर्वी त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.

त्यावेळी त्यांची समजूत काढण्यात आली. मात्र तेव्हा पायलट यांना देण्यात आलेली आश्वासनं अद्यापही पूर्ण झालेली नाहीत.”

Pimpri News | तरुणाविषयी खोटी माहिती सांगितल्याने लग्नासाठी ठेवले ‘झुलवत’; केली आत्महत्या

CoWin Vaccination Update : व्हॅक्सीन सर्टिफिकेटमध्ये काही चूक असेल तर घरबसल्या करा सुधारणा, ‘ही’ आहे पद्धत

Mumbai Building Collapse | मुंबईत मालाडच्या मालवणी येथील 4 मजली रहिवासी इमारत कोसळली; 11 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी

Related Posts