IMPIMP

Lockdown हा पर्याय नाही, निर्बंधाचे पालन करा : आरोग्यमंत्री टोपे

by pranjalishirish
maharashtra corona update will there be lockdown in maharashtra rajesh tope said new option

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा Corona प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने गेल्या 24 तासात 16 हजारांचा टप्पा पार केला आहे. या वर्षातील हा सर्वांत मोठा आकडा आहे. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाउन हा पर्याय नाही. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे, या कोरोना  Corona  प्रतिबंध नियमांचा वापर नागरिकांनी केल्यास रुग्णसंख्येला आळा घालता येईल. त्यामुळे लॉकडाउन टाळण्याकरिता निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोेपे यांनी केले आहे.

आरोग्यमंत्री टोपे rajesh tope म्हणाले की, राज्यात संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांपैकी 85 टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यातील बहुतांश जणांना गृह विलगीकरणाचा सल्ला दिला आहे. परिणामी राज्यात सध्या रुग्णालयातील खाटांची कमतरता नाही. संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात असून, राज्यात कोरोना  Corona  चाचण्यांची संख्या वाढवली आहे. लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जात असून, नागरिकांनीदेखील स्वयंशिस्तीने गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. राज्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती दिली असून, दररोज सव्वा लाख नागरिकांना लस दिली जात आहे. 60 वर्षांवरील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन टोेपे यांनी केले आहे.

Also Read : 

भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी का

‘कोरोना’ पॉझिटिव्ह असूनही शूटिंगला गेली अभिनेत्री गौहर खान ! FIR दाखल

भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन स्वत:च्याच जिल्ह्यात संकटात

Related Posts