IMPIMP

Coronavirus in Maharashtra | धक्कादायक ! महाराष्ट्रातील 10 मंत्र्यांना आणि 20 आमदारांना कोरोनाची बाधा, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं

by nagesh
Coronavirus in Maharashtra | coronavirus maharashtra 10 ministers and 20 mlas in maharashtra are infected coronavirus information ajit pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Coronavirus in Maharashtra | काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गाचा खाली आलेला पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली असून राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यातच डेल्टा (delta variant) आणि ओमायक्रॉन (omicron covid variant) रुग्णांची संख्या ही वाढू लागली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला गेला आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशन काळात (maharashtra winter session) काही मंत्री व आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलेल्या माहितीनुसार १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाचा संसर्ग (Coronavirus in Maharashtra) झाला आहे. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर राज्यात आणखी कठोर निर्बंध लागू (covid restrictions maharashtra) केली जाऊ शकतात असे संकेतही पवार यांनी दिले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अजित पवार म्हणाले की, कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना नियमावलीचे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी पालन करायला हवे आहे.
अधिवेशन पाच दिवस चालले त्या काळात तब्ब्ल १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाच संसर्ग (Coronavirus in Maharashtra) झाला. मोठ्या
प्रमाणात कार्यक्रम साजरे व्हावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा संसर्गाचा वेग पूर्वीपेक्षा जास्त आहे. अमेरिका फ्रान्स, इंग्लंड येथे
दररोज लाखो रुग्ण सापडत आहे. आपण दुसऱ्या लाटेची मोठी किंमतही मोजली आहे. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा असल्याने सरकार प्रयत्न करत आहे.
आतापासून नियम कडक का असा आग्रह करू नये असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Web Title : Coronavirus in Maharashtra | coronavirus maharashtra 10 ministers and 20 mlas in maharashtra are infected coronavirus information ajit pawar

 

हे देखील वाचा :

LPG Cylinder Price | नवीन वर्षात मोठी भेट ! थेट 100 रुपये स्वस्त झाला कमर्शियल LPG सिलेंडर, घरगुती सिलेंडरमध्ये बदल झाला का?, जाणून घ्या

Pune Traffic Police | नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल, शिवाजी रस्ता शनिवारी (उद्या) वाहतुकीस बंद

Sun And Saturn Together In Capricorn Zodiac Sign | जानेवारी 2022 मध्ये मकर राशीत असतील दोन ‘शत्रु’ ग्रह, ‘सूर्य’ आणि ‘शनी’ची ही युती 5 राशींसाठी अतिशय शुभ

 

Related Posts