IMPIMP

कोरोनावरून भाजपची ‘फिल्मी स्टाईल’ टीका, म्हणाले – ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है, सोल्युशन का पता नहीं’

by pranjalishirish
Maharashtra Political Crisis | sharad pawar had told uddhav thackeray about eknath shindes rebellion 4 times

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये  Keshav Upadhye यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला. ‘राज्य सरकारची परिस्थिती ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं’ अशी झाली आहे’, असे त्यांनी म्हटले.

Pravin Darekar : ‘मुख्यमंत्र्यांचं मौन म्हणजे खुर्चीसाठी शांत बसणं अन्…’

भाजप प्रदेश कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत केशव उपाध्ये Keshav Upadhye  बोलत होते. ते म्हणाले, ‘राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध लावण्याच्या नावाखाली लॉकडाऊन लावत जनतेची घोर फसवणूक केली आहे. रोज बदलणारे नियम, मंत्र्यांची परस्परविरोधी विधाने पाहता राज्य सरकारची परिस्थिती ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं’ अशी झाली आहे. तसेच राज्यात कठोर निर्बंध लावले जाणार असून, केवळ आठवड्याच्या अखेरीस शनिवारी, रविवारी पूर्ण लॉकडाऊन असेल असे सरकारमधील चार-चार मंत्र्यांनी विविध वृत्तवाहिन्यांवर सांगितले होते. जनतेच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, मंगळवारी राज्यभरात गोंधळाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने विरोधी पक्षांसह जनतेची सुद्धा फसवणूक केल्याचे दिसून आले’.

फक्त शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देण्याची जबाबदारी आहे का ?

दरम्यान, पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात बाजारपेठा, दुकाने बंद केल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. महाविकास आघाडी सरकारला कठोर निर्बंध लावायचे आहेत की लॉकडाऊन असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे ‘स्टार’ प्रचारक कोरोनाबाधित

आर्थिक मदतीचेही सुचवले

राज्यावरील हे संकट टाळण्यासाठी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून सरकारला साथ देण्यास भाजप तयार आहे. मात्र, सरकारने सामान्य, गोरगरीब, कष्टकरी वर्गाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने या वर्गाला आर्थिक मदत द्यावी, असे भाजपने सुचवले होते, असेही उपाध्ये  Keshav Upadhye म्हणाले.

Read More : 

Coronavirus Cases India : देशात पहिल्यांदा एका दिवसात नोंदली गेली संसर्गाची 1.07 लाख प्रकरणे, केंद्राने लोकांना केले ‘हे’ आवाहन

Mini Lockdown : ‘सरकारने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली’, निर्बंधावर राऊतांचे ‘कडक’ मत

चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !

परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

‘मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, आता राजीनाम्यासाठी रांग लागेल’, केंद्रीय मंत्र्याचा दावा

‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’

‘खा. प्रताप पाटील-चिखलीकरांची माणसे निवडून देऊ नका, भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल’; भाजपमधील गटबाजी उघड

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शरद पवारांची भेट घेणार

Related Posts