IMPIMP

‘माझे मौन हे कुणी कमजोरी समजू नये’, दवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले

by pranjalishirish
coronavirus maharashtra bjp devendra fadnavis target thackeray government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- आतापर्यंत मी गप्प राहिलो, पण माझे हे मौन कुणी कमजोरी समजू नये, म्हणून मला बोलावे लागते आहे. राजकारण करणे ह नेहमीच सोपे असते. पण सुशासन आणि आरोग्य सुविधांचे निर्माण ही खरी क्षमतेची परीक्षा असते. केवळ वैयक्तिक वसुलीसाठी संस्थात्मक विलगीकरणाचे नियम कठोरपणे अंमलात येत नाहीत, असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकामागोमाग एक अनेक ट्विट केले आहेत. या ट्विटमधून त्यांनी सरकारवर टीका केली.

फक्त शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देण्याची जबाबदारी आहे का ?

राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्ण वाढीवर बोलताना देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, महाराष्ट्र सरकारने संपूर्ण लोकांचे जीव धोक्यात घातले आहेत. राज्य सरकारला या महासंकटातून बाहेर पडण्यासाठी बरेच काही करावे लागणार आहे. आणि त्यासाठी त्यांना मदत करण्याची केंद्र सरकराची तयारी आहे. मात्र, राज्य सरकारच्या प्रयत्नांचे काय झाले हे आज सर्वांसमोर आहे. राज्यात केवळ रुग्ण वाढले नाही तर मृत्यूंची संख्या देखील वाढली. जगात सर्वाधिक संसर्ग महाराष्ट्रात झाला आहे. एवढे होऊन ही टेस्टींगमध्ये अद्याप सुधार झालेला नाही आणि रुग्णांचे संपर्क शोधता येत नाहीत, असे फडणवीस Devendra Fadnavis यांनी सांगितले.

कोरोनाच्या लाटेवरून मुख्यमंत्र्यांचे मोठं वक्तव्य; म्हणाले…

देशाच्या कोरोना लढाईत राज्य अडचणीचे ठरले

राज्यात कोरोना रुग्ण वाढत असताना राज्य सरकारने ज्या पद्धतीने गैरव्यवस्थापनाचा कारभार केला, त्यामुळे ते एकमेव असे राज्य ठरले जे देशाच्या कोरोना लढाईत अडचणीचे ठरले आहे. कोरोना लढाईत आम्ही राज्य सरकारला मदत केली, त्यांना सर्व संसाधने उपलब्ध करुन दिली आहे. याशिवाय केंद्रीय चमू पाठवला आहे. ज्येष्ठ नागरिक या वर्गावारीत महाराष्ट्रात 25 टक्के लसीकरण झाले आहे. तर 4 राज्यांत हे प्रमाण 50 टक्क्यांहून अधिक आहे. फ्रंटलाईन वर्कर्स या वर्गवारीत पहिला डोज देण्यात महाराष्ट्राने 73 टक्के लोकांचे लसीकरण केले, तर 5 राज्यात हे प्रमाण 85 टक्क्यांहून अधिक आहे. याच वर्गात दुसरा डोज महाराष्ट्रात 41 टक्के लोकांना दिला आहे. तर 6 राज्यांत हे प्रमाण 45 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याची माहिती देवेंद्र फणवीस यांनी दिली.

Pravin Darekar : ‘मुख्यमंत्र्यांचं मौन म्हणजे खुर्चीसाठी शांत बसणं अन्…’

ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमात सरकारने काय केले ?

महाराष्ट्राने आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी केवळ 41 टक्के लोकांना डोज दिला. तर दुसरीकडे 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी हे उद्दीष्ट 60 टक्क्यांहून अधिक गाठले. आता जो प्राधान्य क्रम ठरवून देण्यात आला आहे, त्यात सरकरने काय केले ? महाराष्ट्राने आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी 86 टक्के लोकांना डोज दिले, तर दुसरीकडे 10 असे राज्य आहेत, त्याठिकाणी हे प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. लसीकरणाचा उद्देश हा आहे की, सर्वात प्रभावित गटातील मृत्यूदर कमी करुन त्यातून उर्वरीत घटकांना संरक्षण देणे. त्यामुळे आधी आरोग्य क्षेत्रातील आणि नंतर 45 वर्षापूढील सर्व घटकांची निवड केली, असे फडणवीस यांनी सांगितले.

Read More : 

Coronavirus Cases India : देशात पहिल्यांदा एका दिवसात नोंदली गेली संसर्गाची 1.07 लाख प्रकरणे, केंद्राने लोकांना केले ‘हे’ आवाहन

Mini Lockdown : ‘सरकारने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली’, निर्बंधावर राऊतांचे ‘कडक’ मत

चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !

परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

‘मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, आता राजीनाम्यासाठी रांग लागेल’, केंद्रीय मंत्र्याचा दावा

‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’

‘खा. प्रताप पाटील-चिखलीकरांची माणसे निवडून देऊ नका, भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल’; भाजपमधील गटबाजी उघड

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शरद पवारांची भेट घेणार

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे ‘स्टार’ प्रचारक कोरोनाबाधित

आ. शिवेंद्रराजे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘Lockdown लावून प्रशासनाकडून मोगलाई’

Related Posts