IMPIMP

संजय राऊतांनी योगी, रुपाणींवर निशाणा, ‘म्हणाले – …तर तिकडचे मुख्यमंत्री निर्णयासाठी वेळ का घालवत आहेत’

by Team Deccan Express
coronavirus sanjay raut slams cms of different states over corona related decision masking

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – संकटाच्या वेळी नागरिकांना ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही सर्वस्वी सरकारची आहे, असे अधोरेखित करताना दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी सरकारवर ताशेरे ओढले. काहीही करा पण नागरिकांना वेळेत ऑक्सिजन उपलब्ध करुन द्या, असे निर्देश न्यायालयाने बुधवारी दिले. भीक मागा, उधार आणा नाहीतर चोरी करा… हा राष्ट्रीय आणीबाणीचा प्रसंग आहे, असे खडे बोल न्यायालयाने मोदी सरकारला सुनावले. परिस्थितीचे गांभीर्य केंद्र सरकारला कळत नाही का ? रुग्णालयांमधील प्राणवायू संपत आहे, मात्र पोलाद प्रकल्प सुरु आहेत याबद्दल आम्हाला धक्का बसला असून आम्ही निराश झालो आहोत, असे न्यायालयाने म्हटले. यावरुन संजय राऊत sanjay raut यांनी ज्या राज्यांमध्ये उच्च न्यायालयांना हस्तक्षेप करावा लागत आहे तेथील मुख्यमंत्र्यांना परिस्थितीचं गांभीर्य नाही का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

सुट्टीवर गावाकडे आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे माओवाद्यांनी केले अपहरण

खासदार संजय राऊत sanjay raut यांनी आज (गुरुवार) मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलने दिल्ली उच्च न्यायालयात ऑक्सिजनच्या अपुऱ्या परवठ्याबाबत दाखल केलेल्या याचिकेवरुन झालेल्या सुनावणीवरुन संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ आणि विजय रुपाणी वर निशाणा साधला.

संजय राऊत sanjay raut म्हणाले, ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी उच्च न्यायालयांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागत आहे. गुजरातमध्ये लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. त्याच प्रमाणे न्यायालायने उत्तर प्रदेशात देखील हस्तक्षेप केला आहे. आता दिल्ली न्यायालयाने हस्तक्षेप केला. जर लोकनियुक्त केंद्र आणि राज्य सरकार असतील तर तिकडचे मुख्यमंत्री निर्णय घेण्यासाठी वेळ का घालवत आहेत. लोकांच्या जिवाशी का खेळताय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

Social Media Reactions : ‘मुख्यमंत्री साहेब, 2 तासात तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न लावून दाखवा’

ही गंभीर बाब आहे
राजधानी दिल्लीतील गंभीर स्वरुपाच्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजनची टंचाई जाणवत आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने औद्योगिक ऑक्सिजन बंद करा. एक दिवस उद्योग बंद राहिले तरी चालतील पण लोकं ऑक्सिजनशिवाय राहुच शकत नाहीत, असे वक्तव्य केले. न्यायालयाचे हे वक्तव्य अत्यंत गंभीर बाब असल्याचे संजय राऊत sanjay raut यांनी म्हटले आहे.

… म्हणूनच FDA चे (आयुक्त अभिमन्यू काळेंच्या नियुक्तीला अजित पवारांचा होता विरोध

टाटांना जमते तर इतरांना का नाही ?
आवश्यकता भासल्यास पोलाद व पेट्रोलियम यांच्यासह उद्योगांना होणारा संपूर्ण पुरवठा वैद्यकीय कारणासाठी वळवला जाऊ शकतो,असे न्यायमूर्ती विपिन संघी व न्यायमूर्ती रेखा पल्ली यांच्या खंडपीठाने सांगितले. आपल्या पोलाद प्रकल्पांसाठी तयार करत असलेला प्राणवायू टाटा वैद्यकीय उपयोगांसाठी वळवू शकत असतील, तर इतर लोक का नाही ? ही लोभाची सीमा आहे. माणुसकीची काही जाणीव उरली आहे की नाही, अशा शब्दात न्यायालयाने ताशेरे ओढले.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts