IMPIMP

… म्हणूनच FDA चे (आयुक्त अभिमन्यू काळेंच्या नियुक्तीला अजित पवारांचा होता विरोध

by Team Deccan Express
ajit pawar did not want abhimanyu kale fda opposed appointment six months ago

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोनावर उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत तातडीने निर्णय न घेतल्याच्या कारणावरून अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. मुळातच काळे यांची या पदावर नियुक्ती करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar यांचा विरोध होता अशी माहिती समोर आली आहे. एका अनुभवी आयपीएस आधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपवावी असा राष्ट्रवादीचा आग्रह होता. मात्र, मात्र या प्रतिनियुक्तीला आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीने ठामपणे विरोध केल्याने त्यांचा नाईलाज झाला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही काहीही करू शकले नाही. अखेर सहा महिन्यांतच काळे यांना या पदावरून हटवावे लागले.

गेल्या काही दिवसात रेमडेसिविर इंजेक्शनचा राज्यात मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागला आहे. दमण येथील बुक्स फार्मा कंपनीकडून रेमडेसिविर मिळविण्यावरून महाआघाडी व भाजपच्या नेत्यांमध्ये श्रेयवादाचे राजकारण सुरू आहे. राज्यात बिकट अवस्था असतानाही इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत आयुक्त काळे यांनी तातडीने निर्णय घेतला नाही. त्यामुळे त्यांची मंगळवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी परिमल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तत्पूर्वी म्हणजे ९ महिन्यनपूर्वी उपमहानिरीक्षक हरीष बैजल यांची या पदावर प्रतिनियुक्ती करण्यात यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न केले होते.

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

राज्य कोरोनासारख्या महामारीला तोंड देत आहे. अशा परिस्थितीमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) आयुक्तपदी अनुभवी व्यक्तीची निवड करण्याचा राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचा आग्रह होता. जेणे करून संकट काळात राज्याला लागणाऱ्या आवश्यक औषधांचा पुरवठा व्यवस्थित व्हावा, यासाठी योग्य नियोजन आणि संबंधित उत्पादक व वितरक कंपन्या आणि साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर योग्य कार्यवाहीसाठी होईल. यांदर्भात या विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी २०१५-१७ या कालावधीत दक्षता अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या आणि सध्या महाराष्ट्र सायबरमध्ये उपमहानिरीक्षक असलेले हरीष बैजल यांची आयुक्त म्हणून प्रतिनियुक्ती करावी, असा प्रस्ताव तयार केला होता. त्याला तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संमती दिली होती. विशेष म्हणजे २८ जुलै २०२० रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar यांनीही तशी शिफारस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मात्र यासंदर्भातील फाईल त्यांच्याकडे गेल्यानंतर तत्कालीन मुख्य सचिव अजोय मेहता, संजयकुमार व अन्य काही सनदी अधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे हेही काही करू शकले नाही अखेर बैजल यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव जवळपास दोन महिने पडून राहिला. अखेर आयएएस लॉबीमुळे तो रद्द करून २१ सप्टेंबरला अभिमन्यू काळे यांची नियुक्ती करण्यात आली.

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

आयुक्तपदी यापूर्वीही होते आयपीएस
आयएएस अधिकारी एफडीएच्या प्रमुखपदी असले तरी यापूर्वी एस. एस. पुरी, डॉ. व्यकेचलम यांनी आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. तर यापूर्वीच्या आयुक्त पल्लवी दराडे या आयआरएस होत्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेन्टीन कमिटीने आयुक्तपदी आयएएस, आयपीएस किंवा संरक्षण विभागातील अधिकारी असावा, असे नमूद केले आहे,मात्र तरीही अनुभवी बैजल यांना सनदी अधिकाऱ्यांनी डावलले होते.

Also Read :

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts