IMPIMP

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

by nagesh
were you wearing nagpuri bangles then angry question khadses daughter mla ram satpute

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरु असताना रेमडेसिवीरची निर्यात सुरू राहिल्याने त्याचा तुटवडा भासत आहे. केंद्र सरकारने वेळीच रेमडेसिविर इंजेक्शनची निर्यातबंदी केली असती तर आपल्याला साठा उपलब्ध झाला असता. मात्र, आपल्याकडे टंचाई असताना केंद्र सरकारने निर्यात सुरु ठेवली. यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप खडसे यांनी रविवारी (दि.18) केला होता. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केला होती. यावरुन भाजप आमदार राम सातपुते यांनी खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. राम सातपुते यांच्या आरोपांना एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवार पक्षाच्या जिल्हा कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आणि केंद्राच्या भूमिकेवर भाष्य करताना जोरदार टोलेबाजी केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. एकनाथ खडसे Eknath Khadse म्हणाले, देवेंद्र फडणवीस राज्यातील सरकार पडणार असल्याचा दावा करत आहेत. परंतु आपले कार्यकर्ते टिकून रहावेत म्हणून फडणवीसांचा हा आटापिटा आहे. मला वाटलं फडणवीस उत्तम भविष्यकार असतील. फडणवीसांनी यापूर्वी चार ते पाच वेळा सरकार पडणार असल्याचे सांगितले. आता त्यांनी पुन्हा दोन तारीख दिली आहे. मी दोन तारखेची वाट पहात असून जर दोन तारखेला सरकार पडले नाही, तर त्यांचा भविष्यकार म्हणून अभ्यास कमी आहे असे मी समजेन, असा टोला खडसेंनी लगावला होता. यावरुन आमदार सातपुते यांनी खडसेंना लक्ष्य केलं.

Nawab Malik : फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर संपूर्ण भाजप का घाबरली? फडणवीसांनी वकीलपत्र घेतलं का?

आमदार राम सातपुते यांनी ट्विट करुन एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सातपुते म्हणाले, नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊ बद्दल बोलत आहात. विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सातपुते यांनी केला. तसेच निष्कलंक देवेंद्र फडणवीसांवर बोलण्या अगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

राम सातपुते यांनी ट्विट करुन एकनाथ खडसे Eknath Khadse यांच्यावर केलेल्या आरोपांना रोहिणी खडसे यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. रोहिणी खडसे म्हणाल्या, अहो, राम सातपुते, एकनाथ खडसे जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही ? तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच तुमच्यात हिंम्मत असेल तर सिद्ध करा ना ? शामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोंबली ? ज्यांचे बद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का ? असा सवाल रोहिणी यांनी राम सातपुते यांना विचारला आहे.

भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतून 2 सदस्यांची हकालपट्टी !

यानंतर रोहिणी खडसे यांनी आणखी एक ट्विट केले आहे. एकनाथ खडसे जर भोसरी प्रकरणात दोषी होते तर चौकशी समितीचा अहवाल विधिमंडळात का मांडला नाही ? दूध का दूध पानी का पानी केले असते, मंत्रिपद तर काढलेच होते… असेही रोहिणी खडसे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Also Read :

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’वर भाजपचा गंभीर आरोप; ‘योजना फक्त दिखाऊ’

एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत

Related Posts