IMPIMP

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

by pranjalishirish
Deputy Chief Minister Ajit Pawar pays homage to District Information Officer Rajendra Sarg

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे पुण्याच्या ससून रुग्णालयात आज पहाटे दुःखद निधन झाले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही सरग यांच्यासारखा अधिकारी गमवावा लागणे, हे अत्यंत क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे अजित पवार Ajit Pawar  यांनी शोक संदेशात म्हंटले आहे.

राजेंद्र सरग यांच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार  Ajit Pawar यांनीही स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन सरग यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. परंतु दुर्दैवाने शासन-प्रशासन पातळीवर अथक प्रयत्न करूनही जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा अखेर करोनाने बळी घेतला.

शिवसेनेकडून भाजपला टोला, म्हणाले – ‘किमान, व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी चालवू नका

कार्यतत्पर,मनमिळावू, शांत, सुस्वभावी म्हणून त्यांचा प्रशासन, माध्यम व सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिक होता. कला व साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नुकताच राजेंद्र सरग यांचा करोना काळातील उत्कृष्ट कामाबद्दल गौरवही करण्यात आला होता.

राजेंद्र सरग यांच्या निधनाने एका आदर्श जिल्हा माहिती अधिकाऱ्याला व व्यंगचित्रकाराला आपण मुकलो आहोत. त्यांच्या अशा अकाली जाण्याने माहिती व जनसंपर्क विभागाचे निश्चितच अपरिमित असे नुकसान झाले आहे. राजेंद्र सरग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो,अशा शब्दात माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तसेच सर्वांनीच परिस्थितीचे गांभीर्य समजून स्वतःची, स्वतःच्या कर्मचाऱ्यांची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी, जनतेनेही शासन-प्रशासन वारंवार देत असलेल्या सूचनांचे पालन करावे,असे आवाहन राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु. आदिती तटकरे यांनी केले आहे.

अनेक ख्यातनाम विचारवंताचे गृहमंत्री अनिल देशमुखांना पाठबळ, म्हणाले…

पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी व प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचे कोरोनाने निधन झाले. राजेंद्र सरग यांच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. शासन प्रशासन पातळीवर अथक प्रयत्न करूनही जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा अखेर कोरोनाने बळी घेतला. मनमिळावू म्हणून त्यांचा माध्यम क्षेत्रामध्ये नावलौकिक होता.

नाशिक जिल्ह्यामधील नांदगाव येथे मराठा विद्या प्रसारक समाजाचे आर्टस् , कामर्स अँड सायन्स कॉलेज मध्ये दीवंगत सरग यांनी शिक्षण घेतले होते. त्यांचा माध्यम क्षेत्रात दांडगा संपर्क होता. कला व साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. अवघ्या पंधरा दिवसांनी त्यांची पदोन्नती होणार होती. त्यामुळे मीडिया जगतात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी पहाटे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली. राजेंद्र सरग यांच्या निधनाने एका आदर्श जिल्हा माहिती अधिकाऱ्याला व व्यगचित्रकाराला आपण मुकलो आहोत.

पत्नी रूग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय, तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय, टिका करणं सोपं पण…’

राजेंद्र सरग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख पेलण्याची शक्ती मिळो, प्रार्थना !

छगन भुजबळ
(मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री, नाशिक)

Also Read : 

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

अबू आझमींचा इशारा, म्हणाले -‘आम्ही सरकारसोबत,पण जनहितासाठी आंदोलन करु’

दुर्दैवी ! ‘कोरोना’मध्ये उत्कृष्ट कार्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून नुकतेच सन्मानित झालेले जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन

राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यात कठोर निर्बंध लावणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

Related Posts