IMPIMP

मोहन भागवत यांची फडणवीसांनी भेट घेतल्यानंतर ‘ऑपरेशन लोटस’ ला मिळतेय गती ?

by pranjalishirish
devendra-fadnavis-chandrakant-patil-meet-mohan-bhagwat-at-rss-headquarters-yesterday

सरकारसत्ता ऑनलाइन – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 24 तासांच्या आतच भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांची नागपुरात भेट घेतली. तसंच सहाकार्यवाह भैयाजी जोशी यांच्याशी चर्चाही केली. यानंतर आता सत्तापरिवर्तनाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

मुंबईहून गेल्यानंतर दोन्ही नेत्यांनी थेट महालातील संघ मुख्यालय गाठलं. आधी सरसंघचालकांची भेट घेऊन नंतर सहकार्यवाहांशी त्यांनी चर्चा केली. साधारण अर्धा तास चाललेल्या या चर्चेत राज्यातील राजकीय स्थितीसह विविध विषयांचा समावेश होता असं बोललं जात आहे. परंतु फडणवीस Devendra Fadnavis किंवा पाटील यांनी कोणीही या भेटीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान, पक्षाच्या स्थानिक नेत्यांना फडणवीस आणि पाटील यांच्या या नागपूर दौऱ्याची कुठलीही कल्पना नव्हती. त्यामुळं हे नेते संघभूमीत आहेत हे कळताच इतर सर्व चकित झाले.

फडणवीस Devendra Fadnavis आणि पाटील यांनी संघ मुख्यालयाला भेट देताच भाजपचा मुहूर्त, मध्यावधी निवडणुकीबाबत चर्चा सुरू झाली. संघाची प्रतिनिधी सभा पुढच्या आठवड्याच्या अखेरीस बंगळुरू येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन दिग्गज नेत्यांची संघ मुख्यालयाला भेट आगामी वाटचालीचे संकेत देणारी आहे असं बोललं जात आहे. महाविकासस आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून सत्तापरिवर्तनाची चर्चा सातत्यानं सुरू आहे. याचे विविध फॉर्म्युलेही चर्चेत राहिले आहेत. त्यामुळं आता परत तसंच वातावरण तयार होताना दिसत आहे.

‘सेनेच्या मुखपत्रात घेतलेली आमची दखल घाव वर्मी लागल्याचं अधोरेखित करते’

संघ मुख्यालयातून निघाल्यानंतर पाटील हे लगेच मुंबईला आणि फडणवीस मूलला रवाना झाले. तत्पूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस यांनी शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला. सेनेच्या मुखपत्रात घेतलेली आमची दखल घाव वर्मी लागल्याचं अधोरेखित करते असं ते म्हणाले.

पश्चिम बंगालनंतर आता महाराष्ट्राचा नंबर’

हे सरकार पडेल आणि 4 महिन्यांनंतर भाजप सत्तेत येईल असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी नुकतंच केलं आहे. पश्चिम बंगालनंतर आता महाराष्ट्राचा नंबर आहे. भाजपचं मिशन महाराष्ट्र सुरू झालं आहे. जनहित विरोधी सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. शुभकार्य कधी ना कधी होणार आहे. हे सरकार 3-4 महिन्यांत पडेल. 4 महिन्यांनंतर भाजप सत्तेत येईल, असं मुनगंटीवार म्हणाले होते. यानंतरच उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.

Alos Read :

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

Related Posts