IMPIMP

Dhananjay Munde | ‘राज्यातील वस्तीगृहे पुन्हा सुरु होणार’ – मंत्री धनंजय मुंडे

by nagesh
Dhananjay Munde | dhananjay munde criticism on state govt for loss agriculture crop

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन – Dhananjay Munde | मागील काही दिवसांपासून कोरोनाचे (Coronavirus) रूग्ण झपाट्याने वाढत असल्याचे दिसले. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यातील शाळा (Schools) महाविद्यालये (Colleges) त्याचबरोबर वसतीगृहे (Hostels) पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, येणा-या सोमवारी (24 जानेवारी) रोजी शाळा, काँलेज सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे कोरोना विषयक नियमांचे पालन करुन पून्हा सुरु केले जाणार आहेत. याबाबत विभागाला आदेश देण्यात आले आहे. अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ट्विटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. त्यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ”कोरोनाचा संसर्ग अचानक वाढल्याने शासनाच्या निर्देशानुसार सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे बंद करण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागला होता. शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून, कोरोनाची परिस्थिती बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत आहे,” असं ते म्हणाले आहेत.

 

 

दरम्यान, ‘विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे कोरोना विषयक नियमांचे पालन करुन पून्हा सुरु करण्याबाबत विभागाला आदेशित करण्यात आले आहे. वसतिगृहे सुरू करताना त्या-त्या जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्राधिकरणाच्या निर्देश व समन्वयाने आवश्यक काळजी घेऊन वसतिगृहे सुरू करावीत, असे निर्देश दिले असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

Web Title :- Dhananjay Munde | NCP leader and minister dhananjay munde said that the hostel of social justice department will be reopened

 

हे देखील वाचा :

Bhumi Pednekar | मेकअपशिवाय सेल्फी शेअर करून भूमी पेडणेकरने चाहत्यांना केले आश्चर्यचकित, अभिनेत्रीला ओळखणे झाले कठीण

Disadvantages Of Sleeping Empty Stomach | सावधान ! उपाशी पोटी झोपणे शरीरासाठी अत्यंत धोकादायक, होते ‘हे’ नुकसान; जाणून घ्या

Pune Crime | खळबळजनक ! पुण्याच्या शिवणेत पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाचा पाठलाग करून गोळीबार; 7 जणांवर FIR

 

Related Posts