IMPIMP

West Bengal : TMC चे नेते दिनेश त्रिवेदी यांचा BJP मध्ये प्रवेश

by amol
Dinesh Trivedi

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Dinesh Trivedi | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एकीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा यांचा गड वाचवण्याकडे कल आहे. तर दुसरीकडे भाजपने येथे बॅनर्जी यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. यातच तृणमूल काँग्रेसचे नेते व माजी खासदार दिनेश त्रिवेदीं Dinesh Trivedi यांनी पक्षाला रामराम करत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीयमंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत माजी खासदार दिनेश त्रिवेदी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपात प्रवेश करताना त्रिवेदींनी Dinesh Trivedi  तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर भ्रष्टाचार व हिंसाचाराचा आरोप करत जोरदार हल्लाबोल केला. त्रिवेदी म्हणाले की, मी निवडणूक लढवली किंवा नाही लढवली तरी मी निवडणूक प्रक्रियेत सक्रीय राहणार आहे. बंगाली जनतेला आता केवळ विकास हवा आहे, भ्रष्टाचार व हिंसा नको. बंगालची जनता आता प्रत्यक्षात बदल घडवायला तयार आहे. राजकारण काही खेळ नाही, गंभीर विषय आहे. ममता बॅनर्जी आपल्या आदर्शांना विसरल्या असल्याचेही ते म्हणाले.

मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त, मृत्यूचे कारण आले समोर

राणी चांदबीबीच्या वंशजांचं आदित्य ठाकरेंना पत्र, केली ‘ही’ मागणी

महाकाली गुंफा घोटाळ्यात शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याचे नाव समोर; उद्धव ठाकरेंचाही पाठिंबा असल्याचा आरोप

Pune : लाखाची लाच घेताना पोलीस निरीक्षक (PI), सहायक पोलीस निरीक्षक (API) एसीबीच्या जाळ्यात

Related Posts