IMPIMP

Pandharpur : …म्हणून ‘वंचित’ च्या उमेदवाराला निवडून द्या, प्रकाश आंबेडकरांचे मतदारांना आवाहन

by pranjalishirish
elect the vba candidate in the pandharpur by election prakash ambedkar

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन- कोळी समाजाच्या लोकांकडे व्हॅलिडीटी सर्टिफिकेट नसल्याने अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. सर्टिफिकेट नसताना नोकरी मिळवणाऱ्यांनी सरकारची फसवणूक केल्याचे गृहित धरून अशा लोकांकडून शासनाने कोट्यावधी रुपयांची वसुली करण्यास सुरुवात केली आहे. ही वसुली थांबवायची असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar  यांनी केले.

Pandharpur : दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेणार, अजित पवारांचे व्यापाऱ्यांना आश्वासन

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. वंचित बहुजन आघाडीकडून बिरप्पा मोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीत अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणुक चुरशीची होणार आहे. प्रत्येक पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी पंढरपूरमध्ये ठाण मांडून आहेत.

माझे मौन हे कुणी कमजोरी समजू नये’, दवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले

प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar  म्हणाले, कोळी समाजातील लोकांना व्हॅलिडीटी सर्टिफिकेट न मिळाल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. कोळी समाजाला व्हॅलिडीटी सर्टिफिकेट मिळावे यासाठी वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केले. मात्र व्हॅलिडीटी सर्टिफिकेट मिळाले नाही. त्यामुळे अनेकांना सरकारी नोकरीतून काढून टाकण्यात आले. तसेच या लोकांनी शासनाची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. नोकरीच्या काळात शासनाने या लोकांवर केलेल्या कोट्यावधी रुपये खर्चाची वसुली सुरु करण्यात आली आहे, असे आंबेडकर म्हणाले.

Keshav Upadhye : ‘…पण शरद पवारांना खोटं पाडू नका’

सरकारने सुरु केलेली वसुली महादेव कोळी समाजाला परवडणारी नाही. त्यांनी हे का सहन करायचे, ही वसुली थांबवली पाहिजे, ही वसुली थांबवायची असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पाठिमागे कोळी समाजाने उभे राहिले पाहिजे. तसेच मोठ्या मताधिक्याने निवडून दिले पाहिजे. असे झाले तर भविष्यात ही वसुली थांबवता येईल, असेही प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar  म्हणाले.

Read More : 

Coronavirus : न्यूझीलंडने भारताबाबत घेतला मोठा निर्णय, 28 एप्रिलपर्यंत ‘नो एंट्री’

Chitra Wagh : ‘ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’

सचिन वाझेंच्या पत्रावरून फडणवीस म्हणाले; ‘पत्र गंभीर…

Chandrakant patil : ‘केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय’

संभाजी भिडे यांची जीभ घसरली, म्हणाले – ‘कोरोना अस्तित्वात नाही, जे जगायचे ते जगतील अन् मरायचे ते मरतील’

महाराष्ट्रापेक्षा गुजरातला लसीचा पुरवठा अधिक, राजेश टोपेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

‘महाराष्ट्राला सर्वात जास्त लसी मिळायला हव्यात, मात्र मुद्दाम दिल्या जात नाहीत’, जयंत पाटलांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

‘खंडणीचे आरोप निराधार, माझी नार्को टेस्ट करा’ ! परब यांचे आव्हान

शरद पवारांची केंद्र सरकारसोबत चर्चा, केंद्र सरकारने दिले ‘हे’ आश्वासन

Related Posts