IMPIMP

परमबीर सिंग यांची हायकोर्टात याचिका, गृहमंत्र्यांवर केला ‘हा’ गंभीर आरोप

by pranjalishirish
former mumbai police commissioner param bir singh files petition in mumbai high court

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर काल सुनावणी झाली, मात्र कोणताही निर्णय न देता परमबीर सिंह यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जावं, असे आदेश सर्वोच्च न्यायालायने दिले. त्याप्रमाणे आज (गुरुवार) परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन करण्यात आलेल्या बदलीला त्यांनी आव्हान दिले आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी विनंती याचिकेत केली आहे.

अँटिलिया बाहेर आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी मुंबई पोलिस दलातील आणि आता निलंबित असलेल्या सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल केले. मुंबईचे पोलीस आयुक्त असलेले परमबीर सिंग Parambir Singh यांना पदावरुन हटवण्यात आले. त्यांच्या जागेवर राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पोलीस आयुक्त पदावरुन हटवल्यानंतर परमबीर सिंग Parambir Singh यांनी लेटरबॉम्ब टाकला. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला 100 कोटी गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंर बदलीच्या आदेशाला आव्हान देत परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तसेच त्या प्रकरणात भाजपच्या काही नेत्यांना अडकवण्यासाठी गृहमंत्र्यांनी दबाव टाकल्याचे याचिकेत म्हटले होते.

परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना प्रथम मुंबई हायकोर्टात जाण्याचे आदेश दिले. त्याचवेळी कोर्टाने देशमुख यांच्यावरील आरोप फार गंभीर असल्याचे निरीक्षण देखील नोंदवले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परमबीर सिंह यांनी आज मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करुन आयुक्त पदावरुन करण्यात आलेल्या बदलीला आव्हान दिले आहे.

याचिकेत सीबीआय चौकशीची मागणी

परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी अनिल देशमुख यांच्याकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये होत असलेली पैशांच मागणी आणि होत असलेला भ्रष्टाचारासंदर्भात 24-25 ऑगस्ट 2020 रोजी तत्कालीन पोलीस महासंचालक यांना कळवले होते. यानंतर सचिन वाझे व संजय पाटील या पोलिस अधिकाऱ्यांमार्फत हॉटेल व्यवसायिकांकडून खंडणी उकळण्याचे टार्गेट अनिल देशमुख यांनी ठेवले. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्याकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी होणे आवश्यक आहे, असे याचिकेत नमूद केले आहे.

याशिवाय गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ज्या बैठका झाल्या त्याचे पुरावे मिळवण्यासाठी
निवसस्थानाबाहेरील सीसीटीव्ही फुटेजची जपणूक होणे गरजेचे आहे. पुरावे नष्ट केले जाऊ शकतात.
त्यामुळे सीबीआय सारख्या स्वतंत्र यंत्रणेला ते ताब्यात घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती देखील याचिकेत करण्यात आली आहे.
तसेच पोलिसांच्या नियुक्त्या, बदल्यांमध्ये राजकीय नेत्यांकडून हस्तक्षेप होऊ नये, पैशांच्या मोबदल्यात ते
होऊ नये यासाठी राज्य सरकारला निर्देश द्यावेत, असेही याचिकेत नमूद केले आहे.

 

 

Also Read : 

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

M नरेंद्र मोदींच्या बांग्लादेशी दौर्‍यावर पाकिस्तानचा सवाल, बांग्लादेश वासियांनी दिले त्यांना चोख प्रत्युत्तर

Ramdas Athawale : ‘ठाकरे सरकार कलंकित, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही’

संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत ? काँग्रेसचा संतप्त सवाल

Ration Card Latest News : रेशन घेण्याबाबत जर तुम्ही सुद्धा करत असाल ‘अशी’ चूक तर व्हा सावध, होऊ शकते 5 वर्षांची जेल

‘केरळचे लोक सुशिक्षित असल्याने भाजपला मतं मिळत नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य

Related Posts