IMPIMP

Sambhaji Raje : ‘सरकारनं तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा’

by pranjalishirish
government-should-solve-maratha-reservation-issue-sambhaji-raje

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – खासदार संभाजीराजे Sambhaji Raje  यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षणाच्या Maratha Reservation संदर्भात बोलताना सरकारवर टीका केली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारच्या भूमिकेत सुरुवातीपासूनच समन्वय नव्हता. वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली? काही ठोस नियोजन आहे की नाही? असे प्रश्न त्यांनी सरकारला विचारले. सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा, असेदेखील ते म्हटले आहे.

काय म्हणाले खासदार संभाजीराजे
मराठा समजाच्या Maratha Reservation आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. उच्च न्यायालयाने मराठा समाजाला सामाजिक मागास असे सिद्ध केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून याला स्थगिती देण्यात आली आहे. मराठा आरक्षणावर १५ ते २५ मार्चला अंतिम सुनावणी करण्यात येणार आहे. मी काही या वर्षीच आरक्षणाचा मुद्दा घेऊन समोर आलेलो नाही. २००७ पासून मी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. २०१३ ला आझाद मैदानात माझ्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला आहे. त्यावेळी नारायण राणे समितीने दिलेलं आरक्षण टिकलं नाही. त्यानंतर २०१७ मध्येसुद्धा मुंबईत जो महामोर्चा निघाला होता, त्यावेळीसुद्धा मला व्यासपीठावर जावे लागले होते. तेव्हा मोर्चाला काहीतरी गालबोट लागू शकतं म्हणून मला आलेल्या लोकांना परत जाण्यास सांगावे लागले होते. सरकारच्या भूमिकेत सुरुवातीपासूनच समन्वय नव्हता. वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली? काही ठोस नियोजन आहे की नाही? हे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहे.

काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनीसुद्धा मराठा आरक्षणाबाबत Maratha Reservation आक्रमक भूमिका घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे यांनी आरक्षणासंदर्भात विविध नेत्यांच्या भेटी घेऊन ठाकरे सरकारला इशारा दिलेला आहे. “मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात. आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या, अन्यथा विष पिऊन मरू द्या,” असा गर्भित इशारा मराठा आरक्षण चळवळीचे मुख्य प्रवर्तक खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून देण्यात आला होता.

Alos Read :

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

MPSC Exam Postpond : अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले – ‘MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं’

21 तारखेला परीक्षा न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा

Birthday SPL : ‘या’ शोमुळं बदललं होतं ‘सिंगर’ श्रेया घोषालचं आयुष्य ! 6 वर्षांनंतर होतेय आई

Related Posts