IMPIMP

Governor Bhagat Singh Koshyari | शरद पवारांच्या टीकेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

by nagesh
Governor Bhagat Singh Koshyari | maharashtra governor bhagat singh koshyari reaction on sharad pawar statement

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यातील विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या (12 mla appointment) मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर निशाणा साधला होता. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले होते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 12 आमदारांबाबत अनेकदा पत्र दिलंय. मात्र उतारवयामुळे त्यांना आठवत नसेल असा टोला लगावला होता. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

महाराष्ट्रात तिन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार (MVA Government) आल्यापासून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात कोणत्याना कोणत्या कारणावरुन वाद रंगताना पहायला मिळत आहे. आता शरद पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, शरद पवार देशातील सन्मानीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी माझ्यावर टीका केली म्हणून मी करावी असं नाही.

 

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांना राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी गेल्या आठ महिन्यांपासून राज्यपालांकडे प्रलंबित आहे. आता यापुढे 12 आमदारांबाबत आग्रही नाही असं राज्यपाल बोलले होते पण शहाण्यांना शब्दाचा मारा… फक्त शहाण्यांना, यापुढे 12 आमदारांच्या प्रश्नाबाबत शब्द खर्ची घालणार नाही, असे शरद पवार म्हणाले होते.

 

Web Title : Governor Bhagat Singh Koshyari | maharashtra governor bhagat singh koshyari reaction on sharad pawar statement

 

हे देखील वाचा :

Pune Crime | खरेदीसाठी आलेल्या महिलांनी हात चालाकीने पळवले सोन्याचे ब्रेसलेट

Shrimant Kokate | ‘पुणे कोणाच्या बापाचं नाय’ हे मनसेनं लक्षात ठेवावं’

Mumbai Crime | ‘या’ अभिनेत्रीचा इंटेरिअर डिझायनरवर छेडछाडीचा गंभीर आरोप; मुंबईत FIR दाखल

Loan Without Guarantee | खुशखबर ! शेतकरी आता विनागॅरंटी घेऊ शकतात 1.60 लाख रुपयांचे कर्ज, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ

DSK Group Cheating Case | फसवणूक प्रकरण : मुंबई उच्च न्यायालयाकडून कुलकर्णी कुटुंबाला मोठा दिलासा

 

Related Posts