IMPIMP

Pune Crime | खरेदीसाठी आलेल्या महिलांनी हात चालाकीने पळवले सोन्याचे ब्रेसलेट

by nagesh
Pune Crime | woman stolen Gold bracelet from shop

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | खरेदीसाठी साथीदारांसह सराफी दुकानात गेलेल्या महिलांनी हातचलाखीने दीड लाख रुपयांचे सोन्याचे ब्रेसलेट लंपास केले. ही घटना सोमवारी दुपारी उत्तूर येथील चैतन्य ज्वेलर्स या दुकानात घडली. याप्रकरणी सराफ संतोष वसंत डुंबरे (वय 47 रा. ओतुर, ता. जुन्नर) यांनी फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे (API Parshuram Kamble) यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुकानांमध्ये बसलेले होते दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन महिला आणि एक पुरुष त्यांच्या दुकानात खरेदीसाठी आले. एका महिलेने सेल्समन कडे सोन्याची चेन दाखविण्यास सांगितले. तो त्यांना सोन्याची चेन दाखवत असताना दुसऱ्या महिलेने ब्रेसलेट दाखविण्यास सांगितले. सेल्समनने ब्रेसलेटचा ट्रे त्यांच्याकडे दिला. त्यावेळी दुसऱ्या महिलेने या सेल्समनला बोलण्यात गुंतवून नकळत सोन्याचे ब्रेसलेट हातचलाखी करून चोरून नेले. त्यानंतर आरोपी खरेदी न करताच दुकानातून पसार झाले. पोलिसांना घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे (API Parshuram Kamble) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | woman stolen Gold bracelet from shop

 

हे देखील वाचा :

Mumbai Crime | ‘या’ अभिनेत्रीचा इंटेरिअर डिझायनरवर छेडछाडीचा गंभीर आरोप; मुंबईत FIR दाखल

Loan Without Guarantee | खुशखबर ! शेतकरी आता विनागॅरंटी घेऊ शकतात 1.60 लाख रुपयांचे कर्ज, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ

Sangli News | शिराळ्यातील फार्महाऊसवर सापडले तब्बल 19 जिवंत नाग; वन विभागाची कारवाई

DSK Group Cheating Case | फसवणूक प्रकरण : मुंबई उच्च न्यायालयाकडून कुलकर्णी कुटुंबाला मोठा दिलासा

 

Related Posts