IMPIMP

Mumbai Crime | ‘या’ अभिनेत्रीचा इंटेरिअर डिझायनरवर छेडछाडीचा गंभीर आरोप; मुंबईत FIR दाखल

by nagesh
Pune Crime | husband forced wife for prostitution business budhwar peth in pimpri chinchwad

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Mumbai Crime | मूंबई (Mumbai) येथे एका अभिनेत्रीने तिच्याच घराचे इंटेरिअर डिझायनिंग (Interior designing) करणाऱ्या व्यक्तिवर छेडछाडीचे गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्रीच्या या गंभीर आरोपांनंतर मुंबईतील ओशीवारा पोलिसांकडून (Oshiwara Police) त्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. ओशीवारा पोलिस (Oshiwara Police Station) ठाण्यात याप्रकरणी गुन्हा (Mumbai Crime) दाखल झाला आहे. तसेच, पोलिस त्या इंटेरिअर डिझायनरचा शोध घेत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

आधी माहिती अशी, ही एक साउथ अभिनेत्री (South actress) असल्याची माहिती समोर येत
आहे. तसेच, हे प्रकरण गेल्या महिन्यात अर्थात जुलै महिन्यात घडलं होतं. या अभिनेत्रीने वीरा देसाई,
(Veera Desai,) अंधेरी या भागात नवं घर खरेदी केलं होतं. तर घराचं इंटेरिअर डिझायनिंग
(Interior designing) करण्यासाठी तिने कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. 35 वर्षीय अभिनेत्रीने काम दिल्यानंतर मागील महिन्यात ती घराचं काम पाहण्यासाठी
आली होती. मात्र त्याने केलेलं काम तिला पटलं नव्हतं, तेव्हा तिने हे कॉन्ट्रॅक्ट संपवायला सांगितलं होतं. या दरम्यान, त्या डिझायनरने तिला अपशब्द
बोलायला सुरूवात केली. तर तिला तिच्याच घरातून बाहेर काढलं. तसेच, तिला त्या व्यक्तिने पोलिसांत जाण्याची धमकी दिली होती. म्हणूनच तक्रार
दाखल करण्यासाठी उशीर झाला आहे.

‘या प्रकरणावरून आता ओशीवारा पोलिस आता त्या इंटेरिअर डिझायनरचा (Interior designing) शोध घेत आहेत. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर भादंवि
कलम 354, 504, 509 या नुसार ओशीवारा पोलीस ठाण्यात (Oshiwara Police Station) गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, याबाबत अधिक
तपास पोलीस (Police) करीत आहेत.

 

Web Title : Mumbai Crime | an actress in mumbai filed molestation complaint against interior designer

Related Posts