IMPIMP

‘मुख्यमंत्र्यांसाठी आमदारकी पणाला लावली, आता मला वनमंत्री करा’; मुख्यमंत्र्यांना ‘या’ नेत्याचे पत्र

by pranjalishirish
haribhau-rathod-wrote-letter-cm-uddhav-thackeray-demanding-forest-ministry

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यभर गाजलेल्या पूजा चव्हाण प्रकरणामुळे गच्छंती झालेल्या संजय राठोड यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यानंतर राठोड यांचे मंत्रिपद आपल्याला मिळावे, यासाठी अनेक आमदारांनी फिल्डिंग लावली आहे. त्यातच आता बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड haribhau rathod यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून, यामध्ये मला वनमंत्री करा, अशी मागणी केली आहे.

बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड haribhau rathod  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत:ची आमदारकी पणाला लावली. शिवसेनेला बंजारा समाजाची गरज आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेले मंत्रिपद मला द्यावे, अशी मागणी हरिभाऊ राठोड यांनी पत्राद्वारे केली आहे.

काँग्रेसच्या कोट्यातून मंत्रिपद

हरिभाऊ राठोड haribhau rathod यांनी वनमंत्रिपदाची मागणी केली आहे. तसेच मला काँग्रेसच्या कोट्यातून मंत्रिपद मिळाले असते, असेही राठोड यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे मला वनमंत्री पद द्यावे, अशी मागणी राठोड यांनी केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

वनमंत्रिपदासाठी ‘हे’ आहेत शर्यतीत

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीत लगेचच वनमंत्रिपद मिळवण्यासाठी लॉबिंग सुरू झाले. संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर अद्याप कोणाची वर्णी लागलेली नाही. सध्या या मंत्रिपदाचा तात्पुरता कारभार मुख्यमंत्री ठरवतील, त्याच मंत्र्याकडे जाईल. मंत्रिमंडळ विस्तारात वनमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, वनमंत्रिपद मिळावं यासाठी संजय रायमुलकर, गोपीकिशन बाजोरिया हे विदर्भातील शिवसेनेचे आमदार प्रयत्न करत आहेत, तर मुंबई-ठाण्यातील आमदरांकडून वनमंत्रिपद मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये आमदार रवींद्र वायकर यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

Alos Read :

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

MPSC Exam Postpond : अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले – ‘MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं’

21 तारखेला परीक्षा न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा

Birthday SPL : ‘या’ शोमुळं बदललं होतं ‘सिंगर’ श्रेया घोषालचं आयुष्य ! 6 वर्षांनंतर होतेय आई

Related Posts