IMPIMP

Jitendra Awhad : SRA प्रकल्पांमधील घरांबाबत सरकारने दिली ‘ही’ माहिती

by pranjalishirish
houses-can-be-sold-five-years-after-demolition-of-sra-project-hut-jitendra-awhad

मुंबई : एसआरए प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी घरं विकता येतील, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड jitendra awhad यांनी दिली आहे. तसेच कोणतीही एसआरएची योजना ही 10-15 वर्षांच्या अगोदर तयार होत नाही. त्यामुळे त्याला घर मिळायला 15 वर्षे लागतात आणि नंतर विकायला 5 वर्षे लागतात असेही म्हणाले.

जितेंद्र आव्हाड jitendra awhad यांनी पत्रकार परिषदेत एसआरएमधील घरांबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यामध्ये ते म्हणाले, एखादी इमारत बांधल्यानंतरचा जो पाच वर्षांचा नियम आहे, तो नियम बदलून त्याची झोपडी पडल्यानंतर त्याला ते पाच वर्षांनंतर विकता आलं पाहिजे. कोणतीही एसआरएची योजना ही 10-15 वर्षांच्या अगोदर तयार होत नाही. त्यामुळे त्याला घर मिळायला 15 वर्षे लागतात आणि नंतर विकायला 5 वर्षे लागतात. त्यामुळे झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी एसआरएतील घर विकण्याचा निर्णय लवकरच होणार असल्याचीही माहिती आव्हाड jitendra awhad  यांनी दिली.

दरम्यान, इमारत बांधल्यानंतर पाच वर्षांत घर विकता येत नाही, त्याऐवजी झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी घर विकता येणार, असा नियम बनवण्यासाठी आम्ही विचार करत आहोत, असेही ते म्हणाले.

Alos Read :

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

MPSC Exam Postpond : अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले – ‘MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं’

21 तारखेला परीक्षा न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा

Birthday SPL : ‘या’ शोमुळं बदललं होतं ‘सिंगर’ श्रेया घोषालचं आयुष्य ! 6 वर्षांनंतर होतेय आई

Related Posts