IMPIMP

MPSC प्रश्नावर अजित पवार म्हणाले – ‘मी काय MPSC चा अध्यक्ष झालेलो नाही’

by pranjalishirish
i-have-not-become-president-mpsc-yet-ajit-pawar

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020’ची परीक्षा पुढे ढकल्याच्या निर्णयावरून राज्यात राजकीय वातावरण तापत आहे. त्यानंतर ही परीक्षा आता 21 मार्चला घेतली जाणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांना प्रश्न चारले असता ते म्हणाले, ‘मी काही अजून MPSC चा अध्यक्ष झालेलो नाही’.

पुण्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे पुण्यात निर्बंध लागू करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री पवार Ajit Pawar यांनी बैठक घेतली. त्यावेळी पुण्यात आलेल्या अजित पवार यांना MPSC च्या परीक्षेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, मी काही अजून MPSC चा अध्यक्ष झालेलो नाही. माझ्या मते MPSC चा विषय संपलेला आहे. काल जे काही घडले ते दुर्दैवी होते. विद्यार्थ्यांच्या संताप आणि भावना योग्यच आहेत. आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. मात्र, काही जण यामध्ये राजकारण करू पाहत आहेत.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या संताप आणि भावना योग्य आहेत. विद्यार्थ्यांसाठी जे काही करायचे ते सरकार करणारच आहे. MPSC ने आज जाहीर केलेल्या 21 तारखेला परीक्षा होणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत, असेही पवार Ajit Pawar म्हणाले.

Alos Read :

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

MPSC Exam Postpond : अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले – ‘MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं’

21 तारखेला परीक्षा न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा

Birthday SPL : ‘या’ शोमुळं बदललं होतं ‘सिंगर’ श्रेया घोषालचं आयुष्य ! 6 वर्षांनंतर होतेय आई

Related Posts