IMPIMP

Jalgaon : ’10 दिवसात सगळं जुळून आलं’ असं म्हणत एकनाथ खडसेंनी सांगितला जळगाव महापालिकेतील विजयाचा ‘फॉर्म्युला’

by pranjalishirish
Eknath Khadse | eknath khadse says we should work very carefully for vidhan parishad after the rajya sabha defeat

सरकारसत्ता ऑनलाइन टीम शिवसेनेनं (ShivSena) सत्ताधारी भाजप (Bharatiya Janata Party – BJP) ला धक्का देत जळगाव महानगरपालिकेत (Jalgaon Municipal Corporation) भगवा फडकवला आहे. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचं हे मोठं अपयश असल्याचं बोललं जात आहे. कारण जळगावात त्यांचं प्रस्थ मानलं जातं. काही दिवसांपूर्वीच भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा झेंडा हाती घेणाऱ्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा हा मोठा विजय मानला जात आहे. कारण काही महिन्यांपूर्वी व्यासपीठावर बोलताना बदल करून दाखवेन असा जाहीर शब्द त्यांनी दिला होता. दरम्यान जळगाव महापालिकेत हा विजय कसा जुळवून आणला याचा फॉर्म्युलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितला आहे. गेल्या 10 दिवसात फासे फिरले असंही त्यांनी सांगितलं आहे.

अधिकारी बनलेल्या उमेदवारांचा राज्य सरकारला सवाल, … मग नियुक्त्या का थांबल्या?

काय म्हणाले  एकनाथ खडसे ?

एकनाथ खडसेंनी Eknath Khadse  सांगितलं की, भाजपची एकहाती सत्ता असूनही जळगावात भाजपला पराभवाची धूळ चारण्याचा सगळा प्लॅन गेल्या 10 दिवसात जुळून आला. एकहाती सत्ता असली तरी कामं होत नव्हती. भ्रष्टाचार वाढल्यामुळं सगळे नगरसेवक आणि जनता देखील नाराज होती. त्यामुळं आमच्याकडे येण्यासाठी नगरसेवकांना फारसा आग्रह करावाच लागला नाही असंही ते म्हणाले.

काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल; ‘या’ नेत्याला मिळणार मंत्रिपद?

’10 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि…’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत जळगाव महानगरपालिका निवडणुकी विषयी झालेल्या चर्चेबद्दल सांगताना एकनाथ खडसे म्हणाले, 10 दिवसांपू्र्वी याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी याबद्दल चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की, तुम्ही महापौरपदासाठी तुमचा उमेदवार दिला तर मी मदत करू शकेन. नुसतं आवाहन केलं तरी नगरसेवक जमू शकतात. त्यानंतर एकनाथ शिंदे, विनायक राऊत यांच्यासोबत चर्चा झाली. शिवाय नाराज नगरसवेकांना फार आग्रह करण्याची गरज देखील पडली नाही. यातील बरेच नगरसेवक मला आधी भेटूनही गेले होते. त्यानंतर हा सगळा प्लॅन ठरला. आमच्याकडे आलेले 22 होते, शिवसेनेचे 15 होते आणि एमआयएमचे 3 आमच्याकडे आले होते असंही खडसेंनी स्पष्ट केलं.

संजय राऊत यांना भाजपचा इशारा; ‘चुकीची कामे केली तर…’

गिरीश महाजन यांच्यावर साधला निशाणा

भाजपचे जळगावातील नेते गिरीश महाजन यांच्यावरही एकनाथ खडसे यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, भाजपच्या स्थानिक नेतृत्वात गर्विष्ठपणा आहे. नगरसेवकांना तुच्छ लेखणं, स्थानिक मागण्यांकडे दुर्लक्ष करणं हे होत होतं. त्यामुळं नगरसेवकांना फार आग्रह करावाच लागला नाही. त्यापैकी बरेच जण महिन्याभरापासून माझ्यामागे फिरत होते. गिरीश महाजन यांच्याविषयी प्रचंड नाराजी होती असंही त्यांनी यावेळी बोलातना नमूद केलं.

Also Read :

सिंधीया यांच्या ज्या ‘जय विलास’ राजवाड्यात झाली चोरी, तिथं आहेत 400 खोल्या आणि 3500 KG चे झुंबर

Sachin Vaze Case : देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशीरा घेतली PM मोदी अन् HM अमित शाह यांची भेट

Sachin Vaze Case : महाविकास आघाडीच्या एक-दोन मंत्र्यांची NIA कडून चौकशी होण्याची शक्यता

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

Related Posts