IMPIMP

Extortion Case | पोलीस निरीक्षक माने मला त्रास द्यायचा; गुरुशरणसिंह चौहानच्या पत्नीने केले गंभीर आरोप

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Extortion case | खंडणी प्रकरणातील (Ransom case) तक्रारदार गुरुशरणसिंह चौहान (Gurusharan Singh Chouhan) याच्या पत्नीने गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. अंबोली पोलीस ठाण्यात (Amboli Police Station) गुन्हा दाखल करण्यासाठी आम्हाला सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घ्यावी लागली. वर्षभर आम्ही न्यायासाठी राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवले. PI सुनील माने (Sunil Mane) मला वारंवार फोन करून मानसिक त्रास देत होता, तर चिमाजी आढाव (Chimaji Adhav) आणि उपायुक्त अकबर
पठाण (DCP Akbar Pathan) माझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात (Extortion case) अडकविण्याची धमकी देताहेत. असा आरोप त्यांनी केला.

पुढं आरोपांमध्ये म्हटलं आहे की, ‘हे तिन्ही पोलीस अधिकारी (Police officer) माझ्या पतीला सतत त्रास देत होते. ‘तुम्ही मोठे व्यावसायिक आहात त्यामुळे तुम्ही आम्हाला पैसे द्यायचे, नाहीतर तुम्हाला खोट्या आरोपात अडकवेन,’ अशी धमकी DCP अकबर पठाण, सुनील माने आणि चिमाजी आढाव यांच्याकडून दिली जात होती. मला सुनील माने वेळी अवेळी फोन करून माझा मानसिक छळ करायचा, तसेच, पठाण,आढाव दोघेही माझ्या नवऱ्याला खोट्या प्रकरणात अडकवेन, पत्नीवर गुन्हा दाखल करेन, अशी धमकी द्यायचे. पत्नीला पैसे आणायला सांग, असं रात्री ते सांगत होते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

घर विका, दागिने विका; मात्र, आम्हाला पैसे आणून द्या, असं म्हणत आमचे खच्चीकरण केले. आम्हाला, मुलांना घरातून बाहेर पडण्याची भीती वाटायची. रक्षणासाठी असलेलेच भक्षण करण्याचा प्रयत्न करू लागले तर दाद मागायची कोणाकडे? असा रक्षण समोर होता असं गुरुशरणसिंह चौहान (Gurusharan Singh Chouhan) याच्या पत्नीने म्हटलं आहे.

दरम्यान, ‘आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तात्कालिक गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस आयुक्त
परमबीर सिंह, विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस खात्यातील वरिष्ठ
अधिकाऱ्यांकडे 2020 मध्ये याबाबत तक्रार केली. मात्र, कोणीच माझ्या मदतीला आले नाही. म्हणून
आम्ही अखेर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने अंधेरी न्यायालयात
जाण्याचा सल्ला दिला. न्याय न मिळाल्यास पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे दाद मागण्याची मुभा दिलीय. त्यानंतर अंबोली पोलिसांनी (Amboli Police) आमची तक्रार दाखल केलीय, असं गुरुशरणसिंह चौहानच्या पत्नीने सांगितलं आहे.

 

Web Title : Extortion Case | police inspector sunil mane harassed me serious allegations gurusharan singh chouhans wife

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘त्या’ खासगी सावकाराविरूध्द हडपसर पोलीस ठाण्यात आणखी एक खंडणीचा गुन्हा

BJP vs Shiv Sena | CM उद्धव ठाकरे, फडणवीसांची बंद दाराआड चर्चा

Burglary in Pune | भारती विद्यापीठ, विमानतळ, खडकी अन् सिंहगड रोड परिसरात घरफोडया, 4 घटनांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास

Pune Metro | पुणे, पिंपरी-चिंचवड मधील मेट्रो सेवा डिसेंबर अखेर सुरु होणार

 

Related Posts