IMPIMP

BJP vs Shiv Sena | CM उद्धव ठाकरे, फडणवीसांची बंद दाराआड चर्चा

by nagesh
Uddhav Thackeray | baramati cm uddhav thackeray taunts opposition leader devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  BJP vs Shiv Sena | केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणेंच्या (Narayan Rane) अटकेनंतर महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध भाजप (BJP vs Shiv Sena) असा संघर्ष बघायला मिळाला. शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते परस्पर आमने-सामने आले. पक्ष कार्यालयांची तोडफोड झाली. यानंतर आता वेगळ्याच घडामोडी सुरू झाल्या आहेत.नुकतंच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काल शिवसेनेबद्दलच्या युतीबाबत सूचक विधान केल्यानंतर आज शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचा देखील सूर काही बदलला. या घडामोडीनंतर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात बंद दाराआड दहा मिनिटं चर्चा झाली आहे. यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

आज केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरु झाली आहे. रत्नागिरीत (Ratnagiri) असताना राणे हे शिवसेनेवर घणाघात करत आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, आज (शुक्रवारी) सह्याद्री अतिथीगृहावर OBC आरक्षणाच्या मुद्यावर सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन केलं गेलं होतं.
या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार,
अनिल परब, अशोक चव्हाण यांच्यासह आदी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

ओबीसी आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक आज सह्याद्री अतिथिगृहात पार पडली.
या बैठकीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ही वेगळी भेटी झाली आहे.
या वेगळ्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
आधी देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद
दाराआड चर्चा झाली.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचं समजते.

एकीकडे रत्नागिरीत (Ratnagiri) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं समजतंय.
ओबीसी आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक आज सह्याद्री अतिथिगृहात पार पडली.
या बैठकीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ही वेगळी भेटी झाली आहे.
या वेगळ्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, आधी फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.
त्यानंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्येच चर्चा झाली.
सेना भाजपा वाद सुरू असतानाच दोन मोठ्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानं तर्कवितर्कांना एकच उधाण आलं आहे.

 

Web Title : BJP vs Shiv Sena | cm uddhav thackeray and devendra fadnavis separate meet after obc political meeting

 

हे देखील वाचा :

Burglary in Pune | भारती विद्यापीठ, विमानतळ, खडकी अन् सिंहगड रोड परिसरात घरफोडया, 4 घटनांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास

Pune Metro | पुणे, पिंपरी-चिंचवड मधील मेट्रो सेवा डिसेंबर अखेर सुरु होणार

 

Related Posts