IMPIMP

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

by pranjalishirish
jaydutt kshirsagar vs sandeep kshirsagar fight again in beed politics

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन- बीड नगरपालिकेच्या निवडणूक तोंडावर आली असताना क्षीरसागर काका-पुतण्यामध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर  Sandeep Kshirsagar या काका-पुतण्यांनी बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. मात्र, निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीने शिवसेनेला मोठा दणका दिला आहे. शिवसेनेचे युवा नेते तथा पटेल फाउंडेशनचे अध्यक्ष शाहीद पटेल यांनी 101 प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

‘गोकुळ’चे राजकारण ! मंत्री सतेज पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना दणका

पटेल फाउंडेशनचे अध्यक्ष शाहीद पटेल यांनी जयदत्त क्षीरसागर यांची साथ सोडून आमदार संदीप क्षीरसागर Sandeep Kshirsagar  यांच्याशी हातमिळवणी केली. पटेल यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. शाहीद पटेल यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.22) राष्ट्रवादी भवनात आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

…म्हणून फडणवीसांच्या निवासस्थानी सुरक्षाव्यवस्थेत वाढ

शाहीद पटेल हे जयदत्त क्षीरसागर यांचे खांदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पटेल फाउंडेशनचे जाळे जिल्ह्यात पसरले आहे. अनेक ग्रामपंचायत सदस्य देखील पटेल यांच्याकडे असल्याने त्यांचे जिल्ह्यात राजकीय वजन चांगले आहे. पटेल यांनी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेसह जयदत्त क्षीरसागर यांना हा मोठा धक्का असल्याचे समजते. पटेल यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे.

मी नाही त्याने मला सोडले … ! सुशांतच्या मृत्यूच्या 9 महिन्यांनंतर अंकिता लोखंडेने दिली त्यांच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया

फोडाफोडीच्या राजकारणाला वेग

विधानसभेच्या निवडणुकीत काका-पुतण्यांमधील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. यातच आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर काका-पुतण्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष पहायला मिळत आहे. यामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला असून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेत आहेत. तर त्यांचे पुतणे आणि विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीमध्ये आहेत. जयदत्त क्षीरसागर यांचा सक्रीय कार्यकर्त्याला फोडून संदीप क्षीरसागर Sandeep Kshirsagar यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना मोठा धक्का दिला आहे.

महाविकास आघाडीसोबत 190 आमदार असल्याचा दावा; हसन मुश्रीफ यांनी दिले भाजपला ‘आव्हान’

शाहीद पटेल यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने नगरपालिका निवडणुकीत पटेल यांचा राष्ट्रवादीला मोठा फायदा होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातच संदीप क्षीरसागर यांचे आठ नगरसेवकांनी काका नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर आता शाहीद पटेल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पुण्याने काकावर कुरघोडी केल्याची चर्चा रंगली आहे.

Also Read :

67th National Awards : ‘छिछोरे’ बेस्ट हिंदी फिल्म, तर ‘मणिकर्णिका’ साठी कंगनाला बेस्ट अ‍ॅक्ट्रेस अवॉर्ड, पहा संपूर्ण लिस्ट

परमबीर सिंगांचा आणखी एक दावा; आता घेतलं रश्मी शुक्लांचं नाव अन् म्हणाले…

Nana Patole : ‘शेतकरी संघटनांच्या 26 मार्चच्या भारत बंदला काँग्रेसचा सक्रिय पाठींबा’

HM अनिल देशमुख यांच्यासाठी शरद पवार हे ’पावर बँक’ बनण्यामागे काय आहे ‘पॉलिटिक्स’?

‘क्लीनचिट द्यायला शरद पवार न्यायाधीश नाहीत’; पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा टोला

Related Posts