‘एवढी चिंता राहुल यांना मी काँग्रेसमध्ये असताना असती तर..’, ‘त्या’ विधानावर ज्योतिरादित्य शिंदेचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी हे पुन्हा एकदा एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले मध्य प्रदेशातील नेते ज्योतिरादित्य शिंदे jyotiraditya scindia यांच्या संदर्भात राहुल गांधी यांनी वक्तव्य केले होते. ज्योतिरादित्या काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर ज्योतिरादित्य शिंदे jyotiraditya scindia यांनी टोला लगावत प्रत्युत्तर दिले आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी आधी याबद्दल चिंता केली असती तर बरं झालं असतं, असा टोला त्यांनी राहुल गांधी यांना लागवाला आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर मध्य प्रदेशातील राजकारण चांगलच तापलं आहे. प्रत्येक पक्षाकडून राहुल गांधी यांच्या या वक्तव्यासंदर्भात भाष्य केले जात आहे. यातच आता स्वत: ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाष्य केलं आहे.
ज्योतिरादित्या शिंदे आज काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. या वक्तव्याला टोला लगावताना शिंदे यांनी म्हटले की, मी काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधींना माझी एवढी चिंता असती तर चांगलं झालं असतं, असं खोचक उत्तर त्यांनी दिले आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशावर भाष्य करताना म्हणाले होते, ते भाजपामध्ये जाऊन मागील बाकावरील विद्यार्थी झाले. ते काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते. मात्र, भाजपमध्ये ते बॅक बेंचर होऊन गेलेत, असा टोला राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना लगावला होता. तसेच तुम्ही एक दिवस नक्की मुख्यमंत्री व्हाल, असं मी त्यांना सांगितले होते. मात्र, त्यांनी वेगळाच मार्ग निवडला. राहुल गांधी पुढे म्हणाले की, मी तुम्हाला लिहून देतो की ते तिथे कधीच मुख्यमंत्री बनू शकत नाहीत. त्यासाठी त्यांना परत काँग्रेसमध्ये यावं लागेल, असंही राहुल गांधी म्हणाले होते.
Comments are closed.