IMPIMP

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी करावी लागणार प्रतीक्षाच ? अजित पवार म्हणाले…

by pranjalishirish
maharashtra-budget-session-2021-ajit-pawar-announces-legislative-council-he-will-provide-rs-50000

मुंबई : राज्यातील शेतकरी जे नियमित कर्जाची परतफेड करतात. अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत मदत देण्याची घोषणा केली. त्यावर आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार  Ajit Pawar यांनी भाष्य केले. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मदतीबाबतचा प्रश्न विरोधी पक्षांकडून केला जात आहे. सरकार मदतीसाठी कटिबद्ध आहे. राज्य सरकार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची मदत करणार आहे. पण परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर हे होणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांपर्यंत मदत करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. पण कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे राज्य सरकारला ते शक्य झाले नाही. त्यानंतर आज सभागृहात यावर अजित पवार Ajit Pawar यांना विरोधकांनी विचारले असता त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, राज्य सरकार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची मदत करणार आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ही मदत केली जाणार आहे.

दरम्यान, अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार Ajit Pawar यांनी तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्ज घेणे आणि परतफेड करणे सोपे होणार असल्याची माहिती दिली.

Also Read :

‘मुंबई पोलिसांचे, थोबाड काळे झाले’, पोलिसांबद्दल फडणवीस असं कसं बोलू शकतात ?

नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले – ‘ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून वाझेंना टार्गेट

Gold Rates Today : सणासुदीमध्ये पुन्हा एकदा स्वस्त झालं सोनं-चांदी, 40 हजारांपेक्षा कमी होणार दर ? जाणून घ्या आजचे भाव

Maharashtra Budget 2021 : विरोधक आक्रमक म्हणताहेत; ‘आज त्यांना आम्ही सोडणार नाही’

Related Posts