IMPIMP

Radhakrushna Vikhe-Patil : ‘मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना एकच काम दिलंय, केंद्रावर आरोप करा अन्…’

by pranjalishirish
maharashtra government criticized by bjp leader radhakrushna vikhe patil on vaccine shortage

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात लसींचा तुटवडा आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यानंतर आता भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील  Radhakrushna Vikhe-Patil यांनी टोला लगावला आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सध्या एकच काम दिले आहे. केंद्रावर आरोप करा आणि आपले पाप झाका’, असेही ते म्हणाले.

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

लसींच्या तुटवड्यावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यामध्ये राधाकृष्ण विखे-पाटील Radhakrushna Vikhe-Patil म्हणाले, ‘इतक्या मोठ्या प्रमाणावर राज्याला व्हॅक्सिन मिळाले. पण त्याचे नियोजन राज्य सरकार करू शकले ना ही. तो नियोजनशून्य कारभार झाकण्यासाठी किंवा लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. आपण केंद्राकडे बोट दाखवत आहे. पण हजारो रुग्ण आज रुग्णालयात आहेत. सध्या मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना एकच काम दिले आहे. केंद्रावर आरोप करा आणि आपले पाप झाका. राज्यातील जनतेला आज वाऱ्यावर सोडल्याची भावना झाली आहे’.

ठाणे महापालिकेचा आरोग्य अधिकारी 5 लाखाची लाच घेताना ACB च्या जाळ्यात

दरम्यान, हजारो रुग्णांना बेड मिळत नाही. नगरमध्ये रेमडेसिव्हिर मिळत नाही, आरोग्य सेवा उपलब्ध नाहीत. आता केंद्रावर बोट दाखवण्यापेक्षा रेमडेसिव्हिर, ऑक्सिजन उपलब्ध करा. प्रत्येक मंत्र्याला आपापल्या मतदारसंघात 200 बेडचे कोविड रुग्णालय उभारायला सांगा. फक्त फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचे समाधान करू शकणार नाही, असेही ते म्हणाले.

Read More : 

गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

Pimpri : ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल अन् डॉ. डी.वाय हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

Related Posts