IMPIMP

मुस्लीमांमध्ये लसीकरणाचा दर कमी, लसीकरणाचा वेग वाढला पाहिजे : राजेश टोपे

by pranjalishirish
Maharashtra Lockdown Again | maharashtra lockdown again health minister rajesh tope big statement regarding restrictions amid rising covid cases

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असताना लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात केले जात आहे. देशात कोरोना रुग्णसंख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर असताना लसीकरणात देखील महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, राज्यात सध्या तीन दिवस पुरेल इतकेच लसीचे डोस शिल्लक असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे  Rajesh Tope  यांनी दिली आहे. त्यामुळे केंद्राकडे लसीची मागणी केल्याची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

फक्त शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देण्याची जबाबदारी आहे का ?

राजेश टोपे Rajesh Tope म्हणाले, राज्यात तीन दिवस पुरतील एवढेच लसीचे डोस शिल्लक आहेत. त्यामुळे त्यांनी केंद्राकडे लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. तसेच दिवसाला सहा लाख लसीकरणाचं टार्गेट पूर्ण करायचे असेल तर लोकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी मुस्लिमांमध्ये लसीकरणाचा दर कमी असून मुस्लिमांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे, असेही सांगितले.

Pravin Darekar : ‘मुख्यमंत्र्यांचं मौन म्हणजे खुर्चीसाठी शांत बसणं अन्…’

दिवसाला सहा लाख लसीकरणाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. गावागावात न घाबरता लसीकरण झालं पाहिजे. अनेकांमध्ये गैरसमज असून, काहीजण पसरवत आहेत. मुस्लिमांमधील गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मुस्लीम धर्मगुरु व राजकीय नेत्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला आहे. मुस्लिमांमध्ये लसीकरणाचा दर कमी असून तो वाढला पाहिजे. ते चांगला प्रतिसाद देत आहे. परंतु ज्यांमध्ये गैरसमज आहे त्यांचा गैरसमज दूर होऊन ते देखील चांगला प्रतिसाद देतील असा विश्वास राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केला.

Coronavirus Updates : पुण्यातील परिस्थिती आणखी बिकट, मनपाने मागितली लष्कराची मदत

14 लाख लसीचे डोस शिल्लक

राज्यात सध्या 14 लाख लसींचे डोस शिल्लक असून ते तीन दिवस पुरतील, अशी भीती टोपे Rajesh Tope यांनी व्यक्त केली आहे. दर आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी केली आहे. केंद्र सरकार लस पाठवत नाही असे नाही पण लस पाठवण्याचा वेग कमी आहे. ज्या पद्धतीने आव्हानात्मक बोललं जातं त्या पद्धतीने केलं जात नाही हे केंद्र सरकारला सांगण आहे, अशी टीका टोपे यांनी केली.

Read More : 

Coronavirus Cases India : देशात पहिल्यांदा एका दिवसात नोंदली गेली संसर्गाची 1.07 लाख प्रकरणे, केंद्राने लोकांना केले ‘हे’ आवाहन

Mini Lockdown : ‘सरकारने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली’, निर्बंधावर राऊतांचे ‘कडक’ मत

चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !

परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

‘मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, आता राजीनाम्यासाठी रांग लागेल’, केंद्रीय मंत्र्याचा दावा

‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’

‘खा. प्रताप पाटील-चिखलीकरांची माणसे निवडून देऊ नका, भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल’; भाजपमधील गटबाजी उघड

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शरद पवारांची भेट घेणार

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे ‘स्टार’ प्रचारक कोरोनाबाधित

आ. शिवेंद्रराजे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘Lockdown लावून प्रशासनाकडून मोगलाई’

Related Posts