IMPIMP

Mahavikas Aghadi-Shivsena | आज मविआची निर्णायक बैठक, उद्या शिवसेना उमेदवारांची पहिली यादी येणार, जाणून घ्या संभाव्य नावे

by sachinsitapure

मुंबई : Mahavikas Aghadi–Shivsena | महायुती (Mahayuti) असो की महाविकास आघाडी, दोघांचे सुद्धा जागावाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी जागांवरून वाद सुरू आहेत. दरम्यान, वेळेअभावी आज-उद्या जागावाटप लवकरात लवकर पूर्ण करणे सर्वच पक्षांना आवश्यक ठरणार आहे. त्यानुसारच आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक मातोश्रीवर होणार आहे. यानंतर उद्या शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे.

महाविकास आघाडीची निर्णायक बैठक आज सायंकाळी पाच वाजता मातोश्रीवर होणार आहे. या बैठकीला मविआचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. महत्वाचे म्हणजे या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार अथवा नाही, याबाबत कोणतीही माहिती समजलेली नाही. या निर्णायक बैठकीत वंचित नसेल तर मोठा पेच लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) मविआ समोर असणार आहे.

दरम्यान, आजच्या मविआच्या निर्णायक बैठकीनंतर उद्या (२६ मार्च) शिवसेना ठाकरे गट आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. संभाव्य उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे असू शकते –

शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार
१. दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
२. उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तीकर
३. उत्तर पूर्व मुंबई – संजय दिना पाटील
४. दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई
५. रायगड – आनंद गीते
६. रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत
७. ठाणे – राजन विचारे
८. धाराशिव – ओमराजे निंबाळकर
९. परभणी -संजय जाधव
१०. सांगली – चंद्रहार पाटील
११. मावळ – संजोग वाघेरे
१२. शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
१३. बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
१४. हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
१५.छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
१६. यवतमाळ वाशिम – संजय देशमुख

Pune Lok Sabha Election 2024 | लोकसभेसाठी पुण्यात काॅंग्रेसतर्फे रवींद्र धंगेकर

Related Posts